आमदारांनंतर आता खासदार देखील शिंदे गटाच्या वाटेवर ?

आज उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री निवासस्थानी झालेल्या महत्त्वाच्या बैठकीला शिवसेनेचे खासदार अनुपस्थित राहिल्याने वेगळी चर्चा
आमदारांनंतर आता खासदार देखील शिंदे गटाच्या वाटेवर ?
ANI

एकनाथ शिंदे यांच्या गटबाजीनंतर कशाप्रकारे सत्ताबदल झाला हे सर्वश्रुत आहेच. मात्र शिंदे गटाची ताकद दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. ठाकरे सरकारची सत्ता गेल्यानंतर आता अस्तित्व टिकवण्याची त्यांची लढाई चालू असल्याचे स्पष्ट चित्र आहे. याच पार्श्वभूमीवर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी बोलावलेल्या बैठकीला शिवसेनेच्या 22 खासदारांपैकी केवळ 15 खासदार उपस्थित राहिल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. मात्र आता आमदारांपाठोपाठ लोकसभेतील शिवसेनेचे खासदारही पक्षनेतृत्वाच्या विरोधात भूमिका घेण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत एनडीएच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू यांना काही खासदारांनी उघडपणे पाठिंबा दर्शवला असतानाच आज उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री निवासस्थानी झालेल्या महत्त्वाच्या बैठकीला शिवसेनेचे खासदार अनुपस्थित राहिल्याने वेगळी चर्चा रंगू लागली.

उपस्थित खासदार :

राज्यसभा खासदार संजय राऊत आणि प्रियांका चतुर्वेदी, लोकसभा खासदारांमध्ये अरविंद सावंत, गजानन कीर्तिकर, विनायक राऊत, श्रीरंग बारणे, धैर्यशील माने, हेमंत गोडसे, राहुल शेवाळे, प्रतापराव देशमुख, सदाशिव लोखंडे, राजन विचारे, राजेंद्र गावित, ओमराजे निंबाळकर आणि अन्य 12 खासदार

अनुपस्थित खासदार :

एकनाथ शिंदे यांचे पुत्र श्रीकांत शिंदे, भावना गवळी, संजय जाधव, संजय मंडलिक, हेमंत पाटील, कृपाल तुमाने, कलाबेन देऊळकर

Related Stories

No stories found.
marathi.freepressjournal.in