
फुले-शाहू-आंबेडकर चळवळीतील कार्यकर्त्या तथा प्रसिद्ध वक्त्या सुषमा अंधारे यांनी गुरुवारी शिवबंधन हाती बांधले. त्यांचा शिवसेना प्रवेश झाल्यानंतर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनीदेखील त्यांच्यावर उपनेतेपद ही महत्त्वाची जबाबदारी सोपवली आहे.
सुषमा अंधारे या फुले-शाहू आणि आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्त्या तसेच प्रसिद्ध वक्त्या आहेत. त्यांनी गुरुवारी उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेना पक्षात प्रवेश केला. “आपल्या सर्वांचा एकच संवैधानिक शत्रू असेल, तर उद्धव ठाकरेंचे नेतृत्व आम्हाला मान्य आहे,” असे सुषमा अंधारे यांनी सांगितले आहे. सुषमा अंधारे याआधी २०१९च्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादीच्या स्टार प्रचारक होत्या. विधानसभा निवडणुकीत त्यांनी राष्ट्रवादीचा जोमाने प्रचार केला होता.
माझ्या डोक्यावर ‘ईडी’च्या फायलींचे ओझे नाही किंवा अमित शहा यांनी कोणतेही प्रलोभन दिलेले नाही. मी आतापर्यंत बाबासाहेब आंबेडकरांची लेक म्हणून लौकिक मिळवला आहे. महाराष्ट्रातील प्रत्येक शिवसैनिकाच्या घरातील बहीण लेक होण्याचा मी प्रयत्न करेन. असे सुषमा अंधारे म्हणाल्या.