चारचाकी नंतर तरुणाने पेटवली दुचाकी ; जालन्यातील घटनेविरोधात मराठा समाज आक्रमक

गेवराई पायगाचे सरपंच मंगेश साबळे यांनी आपली स्वत:ची चारचाकी पेट्रोल टाकून पेटवून दिली होती
चारचाकी नंतर तरुणाने पेटवली दुचाकी ; जालन्यातील घटनेविरोधात मराठा समाज आक्रमक

जालन्यातील अंतरवाली सराटी गावात मराठा समाजाला आरक्षण मिळण्याच्या मागणीसाठी सुरु असलेल्या अमर उपोषण करणाऱ्या मराठा समाजबांधवांवर केलेल्या लाठीचार्ज विरोधात राज्यभरत संताप व्यक्त केला जात आहे. सरकारविरोधात राज्यभरत तीव्र निदर्शने केली जात आहेत. दरम्यान, अनेक ठिकाणी हे आंदोलन हिंसक होताना पाहायला मिळत आहेत. ही घटनेचे व्हायरल व्हिडिओ राज्यभर पसरताच सरकारविरोधात तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.

याचं पाश्वभूमीवर जालना येथे एका युवकाने आपली दुचाकी पेटवून दिली आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. लाठीमार करुन आज तिसरा दिवस उलटला असला तरी या घटनेची धग ही वाढताना दिसत आहे. या पार्श्वभूमीवर राज्याच्या वेगवेगळ्या ठिकाणी आंदोलन केली जात आहेत.दरम्यान, जालन्यातील भोकरदन येते सकल मराठा समाजाच्या वतीने आज आंदोलन करण्यात आलं. यावेळी स्वराज्य संघटनेचा जिल्हाध्यक्ष विकास जाधव या तरुणाने स्वत:ची दुचाकी पेटवून या घटनेचा निषेध नोंदवला. या तरुणाने आपली दुचाकी रस्त्यांच्या मधोमध उभी करुन त्यावर पेट्रोल टाकत ती पेटूवून दिली.

फुलंब्री तालुक्यातील तरुणाने पेटवली कार

दरम्यान, जालन्याच्या आंतरवली गावातील आंदोलकरांवर झालेल्या लाठीहल्ल्यानंतर संतप्त झालेल्या औरंगाबाद जिल्ह्यातील फुलंब्रीतील एका तरुणाने स्वताची साडे नऊ लाख रुपये किंमतीची कार रस्त्याच्या मधोमध उभी करत ती पेटवून दिली होती. शनिवारी फुलंब्री टी पॉइंट येथे रास्तारोको करण्यात आलं होतं. त्यानंतर गेवराई पायगाचे सरपंच मंगेश साबळे यांनी आपली स्वत:ची चारचाकी पेट्रोल टाकून पेटवून दिली. यावेळी जालना येथील घटनेच्या निषेधार्थ जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. यानंतर पोलीस घटनास्थळी येऊन साबळे यांच्यासह इतर कारर्यकर्त्यांना पोलीस ठाण्यात नेण्यात आलं.

logo
marathi.freepressjournal.in