कृषी विद्यापीठातील शिक्षकांच्या सेवानिवृत्तीची वयोमर्यादा ६० वर्ष

कृषी विद्यापीठे तसेच संलग्न महाविद्यालयांतील शिक्षक आणि अध्यापकांच्या सेवानिवृत्तीची वयोमर्यादा ६२ वरून ६० वर्षे करण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला.
कृषी विद्यापीठातील शिक्षकांच्या सेवानिवृत्तीची वयोमर्यादा ६० वर्ष

प्रतिनिधी/मुंबई

कृषी विद्यापीठे तसेच संलग्न महाविद्यालयांतील शिक्षक आणि अध्यापकांच्या सेवानिवृत्तीची वयोमर्यादा ६२ वरून ६० वर्षे करण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. याआधी सेवानिवृत्तीचे वय ६० वरून ६२ वर्षे करण्याबाबतचा निर्णय २०१५ मध्ये घेण्यात आला होता. या विद्यापीठांमधील सहायक प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक, प्राध्यापक, विभाग प्रमुख, सहयोगी अधिष्ठाता, शारीरिक शिक्षण निदेशक, क्रीडा अधिकारी, ग्रंथपाल, अधिष्ठाता आणि संचालक दर्जातील अध्यापकांचा यात समावेश आहे.

विद्यापीठांमध्ये अधिक कार्यक्षम मनुष्यबळ निर्मिती करणे आवश्यक असून भारतीय कृषी अनुसंशोधन परिषदेने नवीन तंत्रज्ञान विकसित करण्याची शिफारस केली आहे. हे पाहता नवीन भरतीमुळे विद्यापीठामंध्ये संशोधन आणि शिक्षण या क्षेत्रात अनुभवी तसेच कुशल अध्यापकीय मनुष्यबळ उपलब्ध होण्यास मदत होणार आहे.

logo
marathi.freepressjournal.in