अजित पवार गट आक्रमक ! शरद पवार गटातील आमदारांविरोधात अपात्रता याचिका दाखल, 'या' आमदारांचा समावेश

राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्हाचा वाद आता निवडणुक आयोगात पोहचला असून ६ ऑक्टोबर रोजी त्याबाबतची सुनावणी होणार आहे.
अजित पवार गट आक्रमक ! शरद पवार गटातील आमदारांविरोधात अपात्रता याचिका दाखल, 'या' आमदारांचा समावेश

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि आमदार जितेंद्र आव्हाड यांनी अजित पवार यांच्या गटातील आमदारांविरोधात अपात्रता याचिका दाखल केल्या आहेत. यानंतर आता अजित पवार गटाने देकील आक्रमक पवित्रा घेतला आहे. आता अजित पवार यांच्या गटाकडून शरद पवार यांच्या गटातील आमदारांविरोधात अपात्रता याचिका दाखल केल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. या आमदारांमध्ये जयंत पाटील, जितेंद्र आव्हाड आणि रोहित पवार यांचा देखील समावेश आहे.

'इंडिया टुडे'ने याबाबतचं वृत्त दिलं आहे. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या कार्यलयात शरद पवार यांच्या गटात असलेल्या आमदारांविरुद्ध अजित पवार गटाकडून अपात्रतेसंदर्भात याचिका दाखल केली आहे. यात राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, आमदार जितेंद्र आव्हाड, आमदार रोहित पवार, राजेश टोपे, अनिल देशमुख, संदीप क्षीरसागर मानसिंग नाईक, प्राजक्त तनपुरे, रविंद्र फुसारा आणि बाळासाहेब पाटील यांचा समावेश आहे.

असं असलं तरी या यादीतून नवाब मलिक, सुमन पाटील, अशोक पवार आणि चेतन तुपे या आमदारांचं नाव वगळण्यात आलं आहे. यापैकी नवाब मलिक आणि चेतन तुपे यांनी आपली भूमिका अद्यापही स्पष्ट केली नाही.

राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्हाचा वाद आता निवडणुक आयोगात पोहचला असून ६ ऑक्टोबर रोजी त्याबाबतची सुनावणी होणार आहे. अजित पवार गटाने दाखल केलेल्या याचिकेबाबत ही सुनावणी पार पडणार आहे.

logo
marathi.freepressjournal.in