आग्रा येथे शिवाजी महाराजांचे भव्य स्मारक; उत्तर प्रदेश सरकारशी समन्वयासाठी मंत्री रावल यांची नियुक्ती

छत्रपती शिवाजी महाराज यांची मुघलांच्या नजरकैदेतून आग्र्याहून सुटका हा शिवचरित्रातील प्रेरणादायी प्रसंग आहे. त्यामुळे उत्तर प्रदेश येथील आग्रा येथे छत्रपती शिवाजी महाराज यांचे भव्य स्मारक उभारण्यात येणार आहे.
आग्रा येथे शिवाजी महाराजांचे भव्य स्मारक
आग्रा येथे शिवाजी महाराजांचे भव्य स्मारकप्रातिनिधिक छायाचित्र
Published on

मुंबई : छत्रपती शिवाजी महाराज यांची मुघलांच्या नजरकैदेतून आग्र्याहून सुटका हा शिवचरित्रातील प्रेरणादायी प्रसंग आहे. त्यामुळे उत्तर प्रदेश येथील आग्रा येथे छत्रपती शिवाजी महाराज यांचे भव्य स्मारक उभारण्यात येणार असून उत्तर प्रदेश सरकारशी संपर्क साधण्यासाठी सयन्वयक म्हणून राजशिष्टाचार व पणन मंत्री जयकुमार रावल यांची नियुक्ती करण्यात आली आहे. याबाबत बुधवारी शासन निर्णय जारी करण्यात आला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीला ३९५ वर्षे पूर्ण झाली आहेत.

logo
marathi.freepressjournal.in