ॲग्री स्टॅक डिजिटल प्लॅटफॉर्मवर ४.५० लाख शेतकरी; एकाच आयडीवर मिळणार बळीराजाची संपूर्ण माहिती

केंद्र व राज्य शासनाच्या महत्त्वाकांक्षी असलेल्या ॲग्री स्टॅक डिजिटल प्लॅटफॉर्मवर सातारा जिल्ह्यातील ४ लाख ७६ हजार शेतकऱ्यांची नोंदणी पूर्ण झाली आहे. त्यामुळे एकाच आयडी नंबरवर शेतकऱ्यांची संपूर्ण माहिती मिळणार आहे. त्याचा उपयोग, विविध योजनांची माहिती घेताना शेतकऱ्यांना होणार आहे.
ॲग्री स्टॅक डिजिटल प्लॅटफॉर्मवर ४.५० लाख शेतकरी; एकाच आयडीवर मिळणार बळीराजाची संपूर्ण माहिती
(Photo Credit Agri Stack)
Published on

कराड : केंद्र व राज्य शासनाच्या महत्त्वाकांक्षी असलेल्या ॲग्री स्टॅक डिजिटल प्लॅटफॉर्मवर सातारा जिल्ह्यातील ४ लाख ७६ हजार शेतकऱ्यांची नोंदणी पूर्ण झाली आहे. त्यामुळे एकाच आयडी नंबरवर शेतकऱ्यांची संपूर्ण माहिती मिळणार आहे. त्याचा उपयोग, विविध योजनांची माहिती घेताना शेतकऱ्यांना होणार आहे.

कृषी क्षेत्रात डिजिटल सेवांचा वापर करून शेतकऱ्यांना जलदगतीने सेवा देण्यासाठी युनिक आयडीचा उपयोग होणार आहे. यात शेतकऱ्यांच्या नावावर शेतजमीन असेल तर त्यांना फार्मर आयडी अर्थात शेतकरी ओळख क्रमांक दिला जाणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना कृषीविषयक सेवा, सुविधा तसेच शासकीय योजनांचे लाभ पारदर्शकपणे मिळू शकतील. यासाठी ॲग्री स्टॅक नावानं डिजिटल प्लॅटफॉर्म तयार करण्यात आला आहे. याची नोंदणी प्रत्येक महा ई-सेवा केंद्रावर सुरू झाली आहे. ॲग्री स्टॅक उपक्रमाची गावस्तरावर मोहीम राबवली जात आहे. आतापर्यंत सातारा जिल्ह्यातील जावली २४ हजार २४५, कराड ६९ हजार ३१३ खंडाळा २२ हजार ५२४, खटाव ६२ हजार २१६, कोरेगाव ४७ हजार २९८, महाबळेश्वर ९ हजार २१६, माण ५३ हजार ४०२, पाटण ५४ हजार २६२, फलटण ४९ हजार ५६६, सातारा ५० हजार १०१, वाई ३४ हजार ६३३ असे मिळून ४ लाख ७६ हजार शेतकऱ्यांनी ओळख क्रमांक मिळवला आहे. ॲग्री स्टॅक हा कृषी क्षेत्रासाठी पायाभूत सुविधा निर्माण करण्याचा उपक्रम आहे.

ॲग्री स्टॅकचे फायदे...

शेतकऱ्यांना सर्व कृषि योजनांचा लाभ मिळण्यात सुलभता येणार आहे. पंतप्रधान शेतकरी सन्मान योजनेतील आवश्यक अटी पूर्ण करुन लाभ प्राप्त करण्यात सुलभता, पीक कर्जासाठी किसान क्रेडीट कार्ड आणि कृषी इन्फास्ट्रक्चर फंड व इतर कृषी कर्ज उपलब्धतेसाठी फायदा, किमान आधारभूत किंमतीवर खरेदीत शेतकऱ्यांचे नोंदणीकरण ऑनलाईन पध्दतीने होणार आहे. वेळेवर कृषीविषयक सल्ले उपलब्ध होणार आहेत. शेतीमध्ये डिजिटल तंत्रज्ञानाचा वापर वाढल्याने शेतकऱ्याला एक फार्मर आयडी मिळाला आहे. शेतीशी संबंधित सर्व माहिती या आयडीच्या माध्यमातून आता मिळणार आहे.

logo
marathi.freepressjournal.in