माणिकराव कोकाटे
माणिकराव कोकाटेसंग्रहित छायाचित्र

कृषिमंत्री माणिकराव कोकाटे आणखी गोत्यात; कर्जवाटपातील अनियमितेबाबत सहकार खात्याची नोटीस

नाशिक जिल्ह्यातील एकेकाळी अर्थवाहिनी असलेल्या नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या कर्ज वाटपात १८२ कोटींची अनियमितता झाल्याप्रकरणी बँकेचे २५ माजी संचालक किंवा त्यांच्या वारसांना सहकार विभागाने नोटीस बजावली आहे.
Published on

हारुन शेख/लासलगाव

नाशिक जिल्ह्यातील एकेकाळी अर्थवाहिनी असलेल्या नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या कर्ज वाटपात १८२ कोटींची अनियमितता झाल्याप्रकरणी बँकेचे २५ माजी संचालक किंवा त्यांच्या वारसांना सहकार विभागाने नोटीस बजावली आहे. यात राज्याचे कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांच्यासह विद्यमान आमदार, खासदार व माजी आमदार यांचा समावेश आहे. याप्रकरणी सहकार मंत्र्याकडे दोन एप्रिल रोजी मंत्रालयात सुनावणी होणार आहे.

नाशिक जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या ३४७ कोटींच्या कर्ज वाटपाच्या चौकशीसाठी तत्कालीन विभागीय सहनिबंधक बलसाने यांनी कलम ८८ अंतर्गत अडीच वर्षे चौकशी केल्यावर समितीच्या अहवालानुसार बँकेच्या २९ माजी संचालक आणि १५ अधिकारी व कर्मचारी एकूण ४४ जणांवर १८२ कोटींची जबाबदारी निश्चित केली आहे. या सर्वांना वसुलीच्या नोटिसा बजावल्या होत्या. मात्र सहकार मंत्र्यांनी या वसुलीस स्थगिती दिल्याने हे प्रकरण प्रलंबित होते. या प्रकरणी दोन एप्रिलला सहकार मंत्र्याकडील सुनावणीत काय निकाल लागतो याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

logo
marathi.freepressjournal.in