Ahmednagar : 'त्या' ७ जणांची आत्महत्या नव्हे तर हत्याच; पोलिसांनी दिली माहिती

एकाच कुटुंबातील (Ahmednagar) ७ जणांचे मृतदेह सापडल्याने खळबळ, पोलिसांनी दिलेल्या माहितीमध्ये सुनियोजित कट असल्याचे समोर
Ahmednagar : 'त्या' ७ जणांची आत्महत्या नव्हे तर हत्याच; पोलिसांनी दिली माहिती

भीमा नदी पात्रामध्ये एकाच कुटुंबातील ७ जणांचे मृतदेह आढळल्याने राज्यात एकाच खळबळ उडाली होती. (Ahmednagar) यानंतर ही आत्महत्या आहे की हत्या? यासंदर्भात चर्चा सुरु झाली. अखेर पोलिसांनी केलेल्या तपासानंतर हा पूर्वनियोजित कट असल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी ४ जणांना अटक करण्यात आली असून पोलीस पुढील तपस करत आहेत. तसेच, ही हत्या कौटुंबिक वादातून झाली असल्याचेही सांगण्यात आले.

काल पुण्यातील दौंड तालुक्यामध्ये असलेल्या यवत गावामध्ये एकाच कुटुंबातील ७ मृतदेह भीमा नदीच्या पात्रात आढळले. यामध्ये दोन पुरुष, दोन महिला आणि तीन लहान मुलांचा समावेश आहे. यानंतर पोलिसांनी केलेल्या तपासामध्ये अनेक धक्कादायक खुलासे समोर आले. मिळालेल्या माहितीनुसार, ही हत्या असल्याचा संशस्य पोलिसांना आला. समोर आलेल्या माहितीनुसार, कुटुंबप्रमुख मोहन पवार हे पत्नी, मुलगी, जावई आणि तीन नातवंडांसोबत नगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्यातील निघोज गावात राहत होते. अहमदनगर येथे मोलमजुरी करून हे कुटुंब उदरनिर्वाह करत होते.

दरम्यान, पोलिसांनी केलेल्या तपासामध्ये हे स्पष्ट झाले की, मोहन पवार यांच्या चुलत भावानेच त्यांची हत्या केली. पूर्व वैमनस्यातून ही हत्या झाल्याचे स्पष्ट झाले आहे. ६ महिन्यापूर्वी या आरोपींमधील चुलत भावांपैकी एकाच्या मुलाचा अपघाती मृत्यू झाला होता. मात्र हा अपघाती मृत्यू नसून मोहन पवारांनी करणी केल्याचा संशय या चौघांना होता. म्हणून ही हत्या केल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी पोलिसांनी कलम ३०२चा गुन्हा दाखल केला आहे. तसेच, याप्रकरणी ४ जणांना ताब्यात घेण्यात आले असून एकजण फरार आहे.

logo
marathi.freepressjournal.in