पुणे विमानतळावर अपघात; 'टग ट्रॅक्टर'ला धडकले एअर इंडियाचे १८० प्रवाशांनी भरलेले विमान

"आम्ही एक तासाहून जास्त वेळ विमानातच बसून होतो. या दरम्यान क्रूकडून काहीच माहिती देण्यात आली नाही. बराच वेळ झाल्यावर अखेर..."
एअर इंडियाच्या विमानाला अपघात
एअर इंडियाच्या विमानाला अपघातसंग्रहित फोटो

पुणे: एअर इंडियाचं दिल्लीला जाणारं विमान काल (१६ मे) पुणे विमानतळावरील रनवेवरील टग ट्रॅक्टरला धडकून अपघात झाला. गुरुवारी दुपारी चार वाजता विमान पुण्याहून उड्डाण करण्याच्या तयारीत असताना ही दुर्घटना घडली. यावेळी विमानात १८० प्रवासी होते. या अपघातामध्ये विमानाच्या समोरील बाजूस नुकसान झालं असून विमानातील सर्व प्रवासी आणि क्रू मेंबर्स सुखरूप आहेत.

अपघातावेळी विमानात होते १८० प्रवासी...

"गुरुवारी एअर इंडियाचं दिल्लीकडे जाणारं विमान पुणे विमातळाच्या रनवेवरील टग ट्रॅक्टरला धडकलं. गुरुवारी दुपारी चार वाजता विमान पुण्याहून उड्डाण करण्याच्या तयारीत असताना ही दुर्घटना घडली. यावेळी विमानात १८० प्रवासी होते. या अपघातात विमानाच्या नाकाजवळ (विमानाचा पुढील भाग) तसेच लँडिंग गिअरजवळच्या टायरला नुकसान झालं. विमानातील सर्व प्रवासी आणि क्रू मेंबर्स सुखरूप आहेत", असं विमानतळ अधिकाऱ्यांनी सांगितलं.

आम्ही एक तासाहून जास्त वेळ विमानात बसून होतो, पण...

विमानाला नुकसान झाल्यामुळं विमानाच्या उड्डाणाला उशीर झाला. विमानातील एका प्रवाशाने टाइम्स ऑफ इंडियाला सांगितले की, "आम्ही एक तासाहून जास्त वेळ विमानातच बसून होतो. या दरम्यान क्रूकडून काहीच माहिती देण्यात आली नाही. बराच वेळ झाल्यावर अखेर वैमानिकाने विमान सामानाच्या ट्रॉलीला धडकल्याचे सांगितले.त्यानंतर आम्हाला उतरवण्यात आले आणि टर्मिनलवर परत नेण्यात आले."

"त्यानंतर रात्री 9.56 च्या सुमारास दुसऱ्या विमानात प्रवेश करतानाही चेक-इन आणि संपूर्ण सुरक्षा प्रक्रियेतून पुन्हा जावे लागले. रात्री 8 च्या सुमारास पाणी आणि नाश्ता देण्यात आला," असे प्रवाशाने सांगितले.

टग ट्रॅक्टर म्हणजे काय?

विमानतळावर प्रवाशांचं सामान किंवा इतर गोष्टी विमानापर्यंत पोहोचवण्यासाठी जे वाहन वापरलं जातं, त्याला टग ट्रॅक्टर म्हणतात.

logo
marathi.freepressjournal.in