Aishwarya Rai : सिन्नरच्या तहसीलदारांनी बजावली ऐश्वर्या राय-बच्चनला नोटीस; 'हे' आहे कारण...

प्रसिद्ध अभिनेत्री ऐश्वर्या राय-बच्चन (Aishwarya Rai) पुन्हा एकदा चर्चेत आली असून यावेळी तिला सिन्नरच्या तहसीलदारांनी एका नोटीस बजावली आहे
Aishwarya Rai : सिन्नरच्या तहसीलदारांनी बजावली ऐश्वर्या राय-बच्चनला नोटीस; 'हे' आहे कारण...

भारतीय चित्रपट सृष्टीतील सुप्रसिद्ध अभिनेत्री आणि बच्चन कुटुंबीयांची सून ऐश्वर्या राय-बच्चन (Aishwarya Rai) पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. तिला सिन्नर तहसीलदारांनी कर थकवल्याप्रकरणी नोटीस बजावली आहे. तिच्यासह तब्बल १२०० मालमत्ताधारकांना ही नोटीस बजावली आहे. मार्च महिन्याच्या अखेरपर्यंत कर वसुलीचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी महसूल विभागाने ही कारवाई केली आहे.

सिन्नर तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यात ठाणगाव जवळीला आडवाडीच्या डोंगराळ भागात ऐश्वर्या राय-बच्चनची एक जमीन आहे. ही जमीन तब्बल एक हेक्टरच्या जवळपास असल्याची माहिती देण्यात आली. या जमिनीच्या एका वर्षाच्या कराचे २१,९७० रुपये थकवल्याने तिला ही नोटीस पाठवण्यात आली. सिन्नर तहसीलला मालमत्ताधारकांकडून वर्षाअंती १.११ कोटींचा महसूल अपेक्षित आहे. त्यापैकी ६५ लाखांची वसुली अद्याप बाकी असून मार्च अखेरपर्यंत वसुलीचे हे उद्दिष्ट असल्याने महसूल विभागाने हे पाऊल उचलले.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in