यंदा उन्हाळी मिरची लागवडीकडे शेतकऱ्यांचा कल; मान्सूनपूर्व हिरव्या मिरचीच्या लागवडीला सुरुवात

अजिंठा, परिसरात दरवर्षीप्रमाणे यंदाही शेतकऱ्यांचा उन्हाळी मिरची लगवडीकडे कल दिसत आहे. गेल्या वर्षी मिरचीला रोगाचा प्रादुर्भावमुळे आणि भाव कमी मिळाल्याने शेतकऱ्यांचे अर्थिक नुकसानीचा सामाना करावा लागला होतो.
यंदा उन्हाळी मिरची लागवडीकडे शेतकऱ्यांचा कल; मान्सूनपूर्व हिरव्या मिरचीच्या लागवडीला सुरुवात
Published on

सुजीत ताजणे/छत्रपती संभाजीनगर

अजिंठा, परिसरात दरवर्षीप्रमाणे यंदाही शेतकऱ्यांचा उन्हाळी मिरची लगवडीकडे कल दिसत आहे. गेल्या वर्षी मिरचीला रोगाचा प्रादुर्भावमुळे आणि भाव कमी मिळाल्याने शेतकऱ्यांचे अर्थिक नुकसानीचा सामाना करावा लागला होतो. गतवर्षीची निरशा झटकून यंदा चांगला भाव मिळेल या आशेवर शेतकरी पाण्याच्या उपलब्धेनुसार मिरची लागवड करीत आहेत.

सिल्लोड तालुक्यातील अजिंठा, आनाड, बाळापूर, पिंपळदरी, गोळेगांव, धोत्रा, पानवडोद, शिवणा, पानस, डिग्रस, सराटी, बोदवड, लिहाखेडी, खंडाळा, वसई, जळकी, अंभई, उंडणगाव आदी भागांतील शेतकरी मान्सूनपूर्व मिरची लागवड करण्यासाठी सरसावले असल्याचे पाहायला मिळत आहे. परिसरात दरवर्षी शेतकरी मोठ्या प्रमाणावर मान्सूनपूर्व मिरचीची एप्रिलअखेर व मे महिन्यात लागवड करतात. या पिकासाठी शेतकऱ्यांकडून पाणी राखून ठेवले जाते.

हवामान खात्याने यंदा अधिक पर्जन्यमानाचा अंदाज वर्तविल्याने शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. यावर्षी इतर कुठल्याही पिकांना योग्य भाव मिळाला नाही. अशा परिस्थितीतही शेतकऱ्यांनी मिरचीचे उत्पादन कायम ठेवले आहे. गतवर्षीची भरपाई यावेळी होईल असे शेतकऱ्यांना वाटते.

एकरी ८० ते ९० हजार रुपये खर्च

मल्चिंग पेपर अंथरून मिरचीची लागवड केली जाते. त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा खर्च करावा लागतो. नांगरणी, रोटावेटरपासून तर मिरची निघेपर्यंत एका एकराला ८० ते ९० हजार रुपये खर्च लागतो. एप्रिलच्या पहिल्या आठवड्यापासून शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात मिरचीला पाणी द्यावे लागते. तर ऊन जास्त असल्यामुळे मिरची पिकावर थ्रिप्स आजार येण्याची शक्यता असते. त्यामुळे औषधीची फवारणी करावे लागते.

परराज्यात मोठी मागणी

सिल्लोड तालुक्यात शिवणा येथे मिरचीची मोठी बाजारपेठ आहे. दरवर्षी येथून पश्चिम बंगाल, उत्तरप्रदेश, दिल्ली, मुंबई, मध्यप्रदेश, पुणे, अमरावती, नागपूर, कानपूर, भिलाई छत्तीसगड, जबलपूर, रायपूर, गजरात, अहमदाबाद, छत्रपती संभाजीनगर यासह इतर राज्यात विक्री साठी पाठवली जाते.

पिंपळदरी येथील शेतकरी मिरची लागवड बेड वरती केली आहेत. यावर्षी एप्रिल ते मे दरम्यान लागवड केलेल्या मिरची पिकाला जून ते जुलै दरम्यान सुरुवातीला चांगला भाव मिळेल या अशेवर आतापर्यंत पंचवीस हजार मिरची लागवड केली.

- तातेराव विठ्ठल लोखंडे, शेतकरी, पिंपळदरी

logo
marathi.freepressjournal.in