पुणे : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात कोणतीही नाराजी नसल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शनिवारी स्पष्ट केले. पुण्याच्या हडपसर येथे 'जनसंवाद' अभियानाच्या उद्घाटनानंतर पवारांनी पत्रकारांशी संवाद साधत या चर्चेला पूर्णविराम दिला.
ते म्हणाले, आम्ही तिघेही समन्वयाने काम करत आहोत. राज्याचा कारभार सुरळीत चालावा, यासाठी प्रयत्नशील आहोत. यावेळी महापालिका निवडणुका स्वबळावर लढविण्याचे संकेतही त्यांनी अधोरेखित केले.
अजित पवार यांनी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदारांच्या समस्या जाणून घेण्यासाठी ही यात्रा सुरू केली. हडपसर मतदारसंघातील नागरिकांच्या समस्यांवर लक्ष केंद्रीत करण्यासाठी जिल्हा प्रशासन आणि महापालिकेतील ३० विभागांचे प्रमुख उपस्थित राहिले. महापालिका आयुक्त नवल किशोर राम आणि जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी व्यासपीठावर पवारांच्या शेजारी बसले.
मी पवारांनी सांगितले, उपमुख्यमंत्री म्हणून येथे आहे, नागरिकांचे प्रश्न सोडवणे हे आमचे काम आहे. अधिकारी उपस्थित आहेत, त्यांची जबाबदारी आहे, वेगळा अर्थ काढू नका.
सातारा गॅझेट प्रकरणात कुणावरही अन्याय होऊ देणार नाही, सर्वांनी बसून मार्ग काढला जाईल, असे आश्वासन पवार यांनी दिले. महिला आयपीएस (IPS) अधिकाऱ्यांच्य प्रकरणावर मात्र त्यांनी प्रतिक्रिया देण्यास नकार दिला. भारत-पाकिस्तान सामना होणार असल्याची माहिती त्यांनी दिली. तसेच, लोकसंख्या वाढल्यामुळे आणि प्रभाग रचना बदलल्यामुळे २०२९ मध्ये खासदारांची संख्या वाढेल, असेही पवार यांनी नमूद केले.
कठोर कारवाई सुरू
कोमकर हत्याकांडप्रकरणी लहान वयातील मुलांची गुन्हेगारीकडे वळणारी स्थिती लक्षात घेऊन केंद्र सरकारने १८ ते २१ वर्षांची वयोमर्यादा कमी करण्याचा विचार करावा. आरोपींवर MCOCA लावण्यात आला असून कठोर - कारवाई सुरू असल्याचे देखील त्यांनी उपमुख्यमंत्र्यांनी सांगितले.