
पुणे : राज्याचे लक्ष लागलेल्या माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीचा निकाल अखेर जाहीर झाला असून, कारखान्यावर अजितदादा पवार यांनीच निर्विवाद वर्चस्व मिळविल्याचे दिसत आहे. अजितदादांच्या निळकंठेश्वर पॅनेलने २१ पैकी २० जागा मिळवत कारखान्यावर सत्ता प्रस्थापित केली आहे. तर सहकार बचाव पॅनेलला केवळ एका जागेवर समाधान मानावे लागले. दुसरीकडे शरद पवारांच्या बळीराजा पॅनेलचा मात्र सुपडा साफ झाला.
माळेगाव सहकारी साखर कारखान्यासाठी २२ जून रोजी मतदान पार पडले. त्याची मतमोजणी जवळपास ३५ तास चालली. त्यामध्ये माळेगाव सहकारी साखर कारखान्यावर उपमुख्यमंत्री अजितदादांचा वरचष्मा कायम राहिला आहे. तर विरोधी गटाकडून सहकार बचाव पॅनलचे चंद्रराव तावरे एकमेव विजयी उमेदवार ठरले आहेत. तावरे वगळता अन्य उमेदवारांना पराभव पत्करावा लागेल. तर शरद पवार गटाचे सर्वच्या सर्व उमेदवार पराजित झाल्याने शरद पवार व सुप्रिया सुळे यांच्यासाठी हा मोठा धक्का मानला जात आहे.
विजयी उमेदवार
१) अजित पवार - भटक्या विमुक्त राखीव
२) श्री विलास देवकाते - अनुसूचित जाती राखीव
३) रतन कुमार भोसले - इतर मागासवर्ग राखीव
४) नितीन कुमार शेंडे - महिला राखीव
५) संगीता कोक
६) ज्योती मुलमुले
माळेगाव गट : ०१
७) शिवराज जाधवराव
८) राजेंद्र बुरुंगले
९) बाळासाहेब तावरे
पणदारे गट : २
१०) योगेश जगताप
११) तानाजी कोकरे
१२) स्वप्नील जगताप
सांगवी गट : 01
१३) चंद्रराव तावरे