बीड मधील अजित पवार गट आक्रमक ; गोपीचंद पडळकरांचा जाळला पुतळा

बीड शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात गोपीचंद पडळकर यांचाय पुतळा जाळून अजित पवार गटाच्या कार्यकर्त्यांनी त्यांच्या वक्तव्याचा निषेध केला
बीड मधील अजित पवार गट आक्रमक ; गोपीचंद पडळकरांचा जाळला पुतळा

भाजपचे विधान परिषदेचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याविषयी केलेल्या वादग्रस्त वक्तव्यावरुन राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे. पडळकरांच्या वक्तव्यावरुन बीडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी जोरदार आंदोलन केलं. बीड शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात गोपीचंद पडळकर यांचाय पुतळा जाळून अजित पवार गटाच्या कार्यकर्त्यांनी त्यांच्या वक्तव्याचा निषेध केला. यावेळी भाजप आमचा मित्रपक्ष असला तरी गोपीचंद पडळकर यांनी केलेलं वक्तव्य खपवून घेतलं जाणार नाही.असा इशारा यावेळी कार्यकर्त्यांनी दिला. तसंच भाजपने तात्काळ पडळकर यांची पक्षातून हकालपट्टी करावी, अशी मागणी देखील यावेळी राष्ट्रवादीचे नेते योगेश क्षीरसागर यांनी केली.

गोपीचंद पडळकारंनी यापूर्वी देखील अनेक वादग्रस्त वक्तव्य केली आहेत. त्यांनी अजित पवार यांच्याविषयी बोलताना आपल्या मर्यादा राखू बोललं पाहीजे. आमच्या नेत्याबद्दल जर अशी पोरकट वक्तव्य केली तर ते आम्ही खपवून घेणार नाही. त्यामुळे भाजप पक्षश्रेष्ठींकडे देखील याचा निषेध व्यक्त करण्यात येणार असून गोपीचंद पडळकर यांनी तात्काळ भाजपमधून हकालपट्टी करावी. अशी मागणी यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाने केली.

आमदार गोपीचंद पडळकर यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्यावरुन राष्ट्रवादी काँग्रेसचा अजित पवार गट आक्रमक झाला असूनभरात याचे पडसाद उमटताना दिसत आहेत. काल पुण्यातील काही कार्यकर्त्यांनी असंच रस्त्यावर उतरुन आंदोलन केलं होतं. पुणे -मुंबई महामार्गावर असलेल्या सोमटने फाटा येथे आंदोलन करण्यात आलं होतं. तसंच काही ठिकाणी पडळकर यांच्या फोटोला जोडे मारो आंदोलन देखील करण्यात आलं होतं.

logo
marathi.freepressjournal.in