शिरूरच्या जागेचा तिढा सुटणार ? अमोल कोल्हे की विलास लांडे ?

शिरूरच्या जागेचा तिढा सुटणार ? अमोल कोल्हे की विलास लांडे ?

शिरूरमधून राष्ट्रवादीचा उमेदवार म्हणून तयारी सुरू केली आहे. भावी खासदार म्हणून त्यांच्या नावाचे बनर्सदेखील झळकले

पुणे : पुणे जिल्ह्यातील शिरूर लोकसभा मतदारसंघातून आगामी लोकसभा निवडणुकीसाठी विद्यमान खासदार अमोल कोल्हे यांनाच राष्ट्रवादीकडून तिकीट देण्याचे निश्चित करत शरद पवार यांनी अजित पवार यांना शह देण्याचा प्रयत्न केला आहे. अजित पवार आणि अमोल कोल्हे यांचे जमत नाही. त्यामुळे अजित पवार हे माजी आमदार विलास लांडे यांना येथून उमेदवारीसाठी प्रयत्नशील होते. लांडे यांनी तशी तयारीही सुरू केली होती.  
माजी आमदार विलास लांडे यांचे २०१९ च्या लोकसभा निवडणुकीसाठीच नाव निश्चित झाले होते. मात्र, अमोल कोल्हे यांनी निवडणुकीच्या आधी राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केल्याने पक्षाने त्यांना संधी दिली. खासदार अमोल कोल्हे राष्ट्रवादीत नाराज असल्याची मध्यंतरी चर्चा होती. अमित शहा यांचीही त्यांनी भेट घेतली होती. त्यामुळे त्यांच्या भाजप प्रवेशाच्या वावड्या उठल्या होत्या. त्यातच अमोल कोल्हे आणि अजित पवार यांचे फारसे पटत नाही. लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर ते भाजपमध्ये प्रवेश करतील, अशी शक्यता वर्तवण्यात येत होती.
माजी आमदार विलास लांडे यांनी या घटनांच्या पार्श्वभूमीवर शिरूरमधून राष्ट्रवादीचा उमेदवार म्हणून तयारी सुरू केली आहे. भावी खासदार म्हणून त्यांच्या नावाचे बनर्सदेखील झळकले आहेत. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी या मतदारसंघाचा आढावा घेतला असता अमोल कोल्हे यांनाच उमेदवारी देण्याचा शरद पवार यांनी निर्णय घेतला असल्याचे कळते. पवार यांनी एकप्रकारे अजितदादा यांना या निमित्ताने शह दिल्याचे बोलले जात आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in