बारामतीच्या निकालावरुन अजित पवार शिक्षकांवर भडकले, म्हणाले...

अल्पबचत भवनात आयोजित जिल्हा शिक्षक पुरस्कार आणि आध्यक्ष चषक पुरस्कार वितरण कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी अजित पवार बोलत होते.
बारामतीच्या निकालावरुन अजित पवार शिक्षकांवर भडकले, म्हणाले...

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे आपल्या खास शैलत बोलण्यासाठी आणि वक्तव्यांसाठी प्रसिद्ध आहेत. त्यात आज त्यांनी पुण्यातील शिक्षकांचे चांगलेच कान टोचले. शिष्यवृत्ती परिक्षेत बारामतीच्या विद्यार्थ्यांचा निकाल शून्य टक्के लागण्याने अजित पवारांना शिक्षकांना चांगलंच धारेवर धरलं आहे. आम्ही इंथं मरमर करतो. आता काय कपाळ फोडून घेऊ का? एवढं सगळं करुनही बारामतीचा निकाल शून्य आहे. अल्पबचत भवनात आयोजित जिल्हा शिक्षक पुरस्कार आणि आध्यक्ष चषक पुरस्कार वितरण कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी अजित पवार बोलत होते.

यावेळी बोलताना अजित पवार म्हणाले की,मुलांना कुठं शिकवायचं हा प्रत्येक पालकाचा अधिकार आहे. त्यामुळे त्यात जाण्यात काही अर्थ नाही. आज गुणवत्त सुधारण्याच्या दृष्टिकोणातून अनेक गोष्टी घडत आहेत. आता पहिल्यापासून इंग्रजी सुरु झालं. याआधी पाचवीपासून होतं. काळानुरुप बदल केला जातो. बदल करण्याची प्रक्रिया सुरु असते. शिष्यवृत्तीत अनेक शाळांचा निकाल चांगला लागला आहे. तर काही शून्य लागला आहे. शिक्षण देण्यासाठी हवं ते दिलं जाईल. मात्र शिक्षण निट द्या. असा सल्ला त्यांनी शिक्षकांना दिला.

logo
marathi.freepressjournal.in