बंडखोर आमदारांवर अजित पवार मेहरबान ; विकासकामांसाठी दिला भरघोस निधी

शिंदे गटाच्या आमदारांना देखील खूश करण्याचा प्रयत्न अजित पवार यांनी केला आहे
बंडखोर आमदारांवर अजित पवार मेहरबान ; विकासकामांसाठी दिला भरघोस निधी

राष्ट्रावादीचे नेते अजित पवार यांच्यासह राष्ट्रवादीच्या नऊ नेत्यांनी शिंदे सरकारमध्ये सामील होत मंत्रीपदाची शपथ घेतली. यानंतर झालेल्या खातेवाटपात अजित पवार यांच्यावर अर्थखात्याची जबाबदारी सोपवण्यात आली. अर्थमंत्री होताच अजित पवार हे अ‍ॅक्शन मोडमध्ये आले आहेत. अर्थखात्याची जबाबदारी घेताच त्यांच्यासोबत बंडखोरी करणाऱ्या राष्ट्वादीच्या आमदारांवर निधीचा वर्षाव करण्यात आला आहे.

अजित पवार यांच्यासोबतच्या आमदारांना भरगोस निधी मिळाल आहे. आपल्या मतदारसंघातील विकासकामांसाठी आमदारांना 25 कोटींहून अधिक निधी देण्यात आला आहे. या निधीसाठी पूरवण्यामागण्यांसाठी खास तरतूद करण्यात आली आहे. विधिमंडळाला सादर करण्यात आलेल्या पुरवणी मागण्यांमध्ये लोकप्रतिनिधींच्या मतदारसंघातील विकास कामांसाठी 1500 कोटींची तरतूद करण्यात आली आहे. अजित पवार यांना साथ देण्याच्या निर्णयामुळे आपल्या मतदारसंघातील रखडलेल्या विकासकामांसाठी 40 कोटींचा निधीमंजूर झाला असल्याचं आमदार सरोज अहिरे यांना माध्यामांसमोर जाहीर केलं.

शिंदे गटाला देखील केलं खुश

अजित पवार निधीवाटपात दुजाभाव करतात असं कारण देत बंड करुन महाविकास आघाडीतून बाहेर पडलेल्या शिंदे गटाच्या आमदारांना देखील खुश करण्याचा प्रयत्न अजित पवार यांनी केलाय. शिंदे गटाची नाराजी टाळण्यासाठी दीड हजार कोटींच्या तरतूदीत राष्ट्रवादीसोबतचं शिंदे गटाच्या काही आमदारांच्या मतदारसंघातील कामांसाठी निधीची तरतूद करण्यात आली आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in