गाय संशोधन केंद्रास अजित पवारांचे नाव; महाराष्ट्र कृषी शिक्षण आणि संशोधन परिषदेच्या बैठकीत निर्णय

महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी अंतर्गत देशी गाईंचे संगोपन आणि संवर्धन तसेच दूध, दुग्धजन्य उत्पादने, गोमूत्र आणि शेण प्रक्रियेवरील संशोधनासाठी कार्यरत असलेल्या देशी गाय संशोधन आणि प्रशिक्षण केंद्राचे ‘अजितदादा पवार देशी गाय संशोधन आणि प्रशिक्षण केंद्र’ असे नामकरण करण्यास मान्यता देण्यात आल्याची माहिती कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी सोमवारी दिली.
गाय संशोधन केंद्रास अजित पवारांचे नाव; महाराष्ट्र कृषी शिक्षण आणि संशोधन परिषदेच्या बैठकीत निर्णय
गाय संशोधन केंद्रास अजित पवारांचे नाव; महाराष्ट्र कृषी शिक्षण आणि संशोधन परिषदेच्या बैठकीत निर्णयfacebook
Published on

मुंबई : महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी अंतर्गत देशी गाईंचे संगोपन आणि संवर्धन तसेच दूध, दुग्धजन्य उत्पादने, गोमूत्र आणि शेण प्रक्रियेवरील संशोधनासाठी कार्यरत असलेल्या देशी गाय संशोधन आणि प्रशिक्षण केंद्राचे ‘अजितदादा पवार देशी गाय संशोधन आणि प्रशिक्षण केंद्र’ असे नामकरण करण्यास मान्यता देण्यात आल्याची माहिती कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी सोमवारी दिली.

महाराष्ट्र कृषी शिक्षण आणि संशोधन परिषदेची १२२ वी बैठक पुण्यात पार पडली. या बैठकीत झालेल्या निर्णयाची माहिती भरणे यांनी दिली. दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या संकल्पनेतून नावीन्यपूर्ण अशा देशी गाय संशोधन आणि प्रशिक्षण केंद्राची स्थापना करण्यात आली होती. देशी गाईंच्या मौल्यवान, दुर्मीळ प्रजातींचे जतन, त्यांची दुग्धक्षमता वाढवणे तसेच शाश्वत शेतीसाठी शेतकऱ्यांना मार्गदर्शन करणे या महत्त्वाच्या बाबींवर या केंद्रामार्फत कार्य सुरू आहे. त्यांच्या पश्चात या केंद्रास त्यांचे नाव देऊन त्यांच्या कार्याची आणि स्मृतीची जपणूक करण्यात येणार असल्याचे भरणे यांनी स्पष्ट केले.

बैठकीत देशी गाय संशोधन आणि प्रशिक्षण केंद्राच्या बळकटीकरणासाठी आवश्यक खर्चास प्रशासकीय मान्यता मिळावी यासाठी शासनाकडे शिफारस करण्यात आली. त्यानुसार या केंद्रासाठी गोशाळा, सिलो बंकर, बायोगॅस युनिट्स, कंपोस्टिंग आणि स्टोरेज युनिट्स, प्रयोगशाळा, शेतकरी वसतिगृह, प्रशिक्षण हॉल तसेच प्रशासकीय आणि निवासी इमारती आदी कामांसाठी टप्पा-२ अंतर्गत ५६ कोटी रुपये उपलब्ध होणार आहेत, असे भरणे यांनी सांगितले.

कृषी शिक्षणाची गुणवत्ता उंचावणे, संशोधन अधिक परिणामकारक करणे, नव्या तंत्रज्ञानाचा शेतकऱ्यांपर्यंत प्रसार करण्याबाबत चर्चा झाली. राज्यातील कृषी विद्यापीठे आणि संशोधन संस्थांमधील समन्वय अधिक मजबूत करून शेती क्षेत्राला नवी दिशा देण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला.

बैठकीत देशी गाय संशोधन आणि प्रशिक्षण केंद्राच्या बळकटीकरणासाठी आवश्यक खर्चास प्रशासकीय मान्यता मिळावी यासाठी शासनाकडे शिफारस करण्यात आली.

logo
marathi.freepressjournal.in