Ajit Pawar Plane Crash : सिंह यांची आतापर्यंत दोन वेळा चौकशी; समाधानकारक उत्तरे दिली नसल्याचा दावा

राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघातप्रकरणी व्हीएसआर कंपनीचे प्रमुख व्ही. के. सिंह यांची सीआयडीकडून पुन्हा दोन दिवस चौकशी करण्यात आली असून आतापर्यंत एकूण तीन दिवस चौकशी करण्यात आली आहे. मात्र, या चौकशीत सिंह आणि कंपनीकडून कोणतीही समाधानकारक उत्तरे मिळाली नसल्याचा दावा सीआयडीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी केला.
Ajit Pawar Plane Crash : सिंह यांची आतापर्यंत दोन वेळा चौकशी; समाधानकारक उत्तरे दिली नसल्याचा दावा
Published on

पुणे : राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघातप्रकरणी व्हीएसआर कंपनीचे प्रमुख व्ही. के. सिंह यांची सीआयडीकडून पुन्हा दोन दिवस चौकशी करण्यात आली असून आतापर्यंत एकूण तीन दिवस चौकशी करण्यात आली आहे. मात्र, या चौकशीत सिंह आणि कंपनीकडून कोणतीही समाधानकारक उत्तरे मिळाली नसल्याचा दावा सीआयडीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी केला.

बारामती विमानतळाजवळील २८ जानेवारीला झालेल्या विमान अपघाताकरणी सीआयडीचे पथक तपास करत आहे. या प्रकरणी मागील आठवड्यात सीआयडीच्या पथकाने त्यांच्या कार्यालयात बोलावून एकाच दिवशी आठ तास चौकशी केली होती. त्यानंतर पुन्हा दोन दिवस चौकशी करण्यात आली आहे. व्हीएसआर कंपनीचे अपघातग्रस्त विमान कधी खरेदी करण्यात आले, त्याचा वापर आतापर्यंत नेमका कसा कसा झाला आहे, विमानाचा मेंटनन्स कशा प्रकारे करण्यात येत होता, काही तांत्रिक अडचण होती का, अपघातापूर्वीचा सद्यस्थिती अहवाल, पायलट व क्रू मेंर्बस नेमणूक, बुकिंग कोणी केले, मुंबई ते बारामती विमान कसे गेले, याची चौकशी करण्यात आली आहे.

अंतिम अहवाल मिळणे बाकी

विमान अपघात तपास संस्था (एएआयबी) यांनी त्यांचा प्राथमिक अहवाल दिला असून तो अंतिम स्वरूपात मिळणे गरजेचे आहे. सीआयडीने व्हीएसआर कंपनीला विविध प्रश्नांची उत्तरे मागितली होती. परंतु त्याबाबत कंपनीने अद्याप समाधानकारक उत्तरे दिली नाहीत, असेदेखील सूत्रांनी सांगितले.

logo
marathi.freepressjournal.in