अजित पवार अपघाताबाबत इतके दिवस काय केले? हर्षवर्धन सपकाळ यांचा सुनील तटकरेंना सवाल

स्वर्गीय अजित पवार यांच्या विमान अपघाताची सखोल चौकशी करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेणार असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी जाहीर केले आहे. यावरून काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी तटकरेंना सवाल केला. अपघाताच्या तपासाबाबत इतके दिवस नेमके काय केले? आतापर्यंत झोपून होता का?...
अजित पवार अपघाताबाबत इतके दिवस काय केले? हर्षवर्धन सपकाळ यांचा सुनील तटकरेंना सवाल
अजित पवार अपघाताबाबत इतके दिवस काय केले? हर्षवर्धन सपकाळ यांचा सुनील तटकरेंना सवाल
Published on: 

पुणे : स्वर्गीय अजित पवार यांच्या विमान अपघाताची सखोल चौकशी करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेणार असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी जाहीर केले आहे. यावरून काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी तटकरेंना सवाल केला. अपघाताच्या तपासाबाबत इतके दिवस नेमके काय केले? आतापर्यंत झोपून होता का? असा थेट प्रश्न त्यांनी रविवारी पत्रकारांशी बोलताना उपस्थित केला. अजित पवार यांच्या निधनाबाबत उपस्थित होणाऱ्या सर्व शंकांचे निरसन होण्यासाठी तपासात पारदर्शकता असणे आवश्यक असल्याचेही त्यांनी सांगितले.

विमान अपघाताच्या चौकशीबरोबरच सपकाळ यांनी निवडणूक आयोगाच्या कार्यपद्धतीवरही टीका केली. निवडणूक प्रक्रियेच्या पारदर्शकतेबाबत जनतेच्या मनात संभ्रम निर्माण झाला आहे. सुमारे ३०० खासदार एकत्रितपणे जाऊनही निवडणूक आयुक्त भेट देत नसल्याचा आरोप त्यांनी केला.

मतदारसंघ पुनर्रचना अर्थात डिलिमिटेशनच्या मुद्द्यावरून त्यांनी भाजपवर निशाणा साधला. या विषयावर इंडिया आघाडीतील सर्व घटक पक्ष एकत्र येऊन भूमिका मांडतील, असे त्यांनी स्पष्ट केले. आमदार रोहित पवार यांच्या संभाव्य काँग्रेस प्रवेशाच्या चर्चांवर मात्र त्यांनी सावध भूमिका घेत मित्रपक्षाच्या अंतर्गत घडामोडींवर भाष्य करणे टाळले.

सीबीआय चौकशीची पहिल्या दिवसापासून मागणी

अजित पवार यांच्या विमान अपघाताच्या चौकशीबाबत सुनील तटकरे यांनी सांगितले की, पक्षाने पहिल्या दिवसापासून सीआयडीसोबतच सीबीआय चौकशीची मागणी मुख्यमंत्री आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याकडे केली आहे. अपघाताचा प्राथमिक अहवाल पक्षाला मान्य नसून, सत्य समोर येण्यासाठी आगामी हिवाळी अधिवेशनात खासदार प्रफुल्ल पटेल, पार्थ पवार आणि अन्य सहकाऱ्यांसह केंद्रीय गृहमंत्र्यांची भेट घेण्यात येणार आहे. यावेळी देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करून केवळ प्रसिद्धीसाठी वक्तव्ये करण्याच्या प्रवृत्तीचाही त्यांनी निषेध केला.

(संबधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)