जनतेच्या मनातले भावी मुख्यमंत्री अजित पवार; सासरवाडी 'तेर'मध्ये झळकले पोस्टर

काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांचे 'भावी मुख्यमंत्री' म्हणून पोस्टर झळकले होते, त्यानंतर आज पुन्हा एकदा त्यांच्या तेरमध्ये पोस्टर झळकले
जनतेच्या मनातले भावी मुख्यमंत्री अजित पवार; सासरवाडी 'तेर'मध्ये झळकले पोस्टर
Published on

गेले काही दिवस अजित पवार हे महाराष्ट्राच्या राजकारणातील केंद्रबिंदू बनले आहेत. तसेच, त्यांच्या पक्षातील नाराजीच्या चर्चा आणि भाजप पक्षप्रवेशाच्या चर्चांना उधाण आले आहे. अशामध्ये आज अजित पवार यांची सासुरवाडी असलेल्या धाराशिव जिल्ह्यातील 'तेर'मध्ये अजित पवार मुख्यमंत्री होणार असे पोस्टर झळकले आणि पुन्हा एकदा चर्चांना उधाण आले.

तेर गावातील चौकांमध्ये 'तेरचे जावई ,आमचे नेते जनतेच्या मनातील भावी मुख्यमंत्री अजित पवार,' अशा आशयाचे पोस्टर लावण्यात आले. या पोस्टरची चर्चा संपूर्ण राज्यात झाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ते मुख्यमंत्री व्हावेत म्हणून तेर गावातील लोकांनी संत गोरोबा काकांना साकडे घातले असून आज सकाळी संत गोरोबा काकांच्या मंदिरात विधिवत पूजा करण्यात आली. याची चांगलीच जोरदार चर्चा आज राजकीय वर्तुळात झाली.

logo
marathi.freepressjournal.in