पवार साहेबांचं आधीच ठरलं होत - अजित पवार

शरद पवार यांनी निवृत्ती जाहीर केल्यानंतर सर्वांनीच पवारांना निर्णय मागे घ्यावा असा आग्रह धरला
पवार साहेबांचं आधीच ठरलं होत - अजित पवार

राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी अचानक निवृत्ती जाहीर केली. त्यांनी पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मोठा भूकंप झाला आहे. शरद पवार असा निर्णय घेतील असे कोणाला वाटले नव्हते. मात्र पवारांच्या या निर्णयाने सर्वांनाच धक्का बसला आहे. या राजीनाम्याला सर्वांनी विरोध केला आहे.

पवारांनी अचानक राजीनामा का घेतला? अशी चर्चा सुरू झाली आहे. मात्र, शरद पवार राजीनामा देणार हे आधीच निश्चित झाल्याची माहिती समोर येत आहे. असे खुद्द अजित पवार यांनी आपल्या भाषणात म्हटले आहे. शरद पवार यांनी निवृत्ती जाहीर केल्यानंतर सर्वांनीच पवारांना निर्णय मागे घ्यावा असा आग्रह धरला. यावेळी बोलताना सर्व नेत्यांनी पवारांना राजीनामा मागे घेण्याची विनंती केली. मात्र राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी पवारांचा राजीनामा आधीच ठरल्याचे स्पष्ट करून सर्वांनाच धक्का दिला. नवीन अध्यक्ष शरद पवार यांच्या मार्गदर्शनाखाली अध्यक्ष काम करेल. 

logo
marathi.freepressjournal.in