कल्याण घटनेचे विधानसभेत पडसाद; मराठी माणसावरील अन्याय खपवून घेणार नाही; अजित पवारांचा संबंधितांना इशारा

महाराष्ट्रात मराठी माणसावर होणारा अन्याय खपवून घेणार नाही. मराठी माणसावर अन्याय करणारा अधिकारी कोणी असो, त्याची गय केली जाणार नाही, अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी इशारा दिला.
कल्याण घटनेचे विधानसभेत पडसाद; मराठी माणसावरील अन्याय खपवून घेणार नाही; अजित पवारांचा संबंधितांना इशारा
Published on

नागपूर : महाराष्ट्रात मराठी माणसावर होणारा अन्याय खपवून घेणार नाही. मराठी माणसावर अन्याय करणारा अधिकारी कोणी असो, त्याची गय केली जाणार नाही, अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी इशारा दिला. कल्याण येथील योगी धाम सोसायटीत मराठी माणसाला झालेली मारहाणीचे पडसाद विधानसभेत उमटले. याप्रकरणी तातडीने कारवाई करावी, असे आदेश देण्यात येतील, असे अजित पवार यांनी सभागृहात सांगितले.

कल्याण येथील बाब ‘पॉइंट ऑफ इन्फॉर्मेशन’च्या माध्यमातून आमदार सुनील प्रभू यांनी विधानसभेत मांडली. त्यावर अजित पवार यांनी, हा महाराष्ट्र ‘शिव-शाहू-फुले आंबेडकरां’चा महाराष्ट्र आहे. इथे कुणी मराठी माणसावर अन्याय करत असेल तर ते चालणार नाही. सभागृहातील माहिती तपासून मराठी माणसावर अन्याय करणारा ‘तो’ अधिकारी कितीही मोठ्या बापाचा असला, तरी त्याची गय केली जाणार नाही. त्याच्यावर कडक कारवाई केली जाईल.

शिवसेना मराठी कुटुंबाच्या पाठीशी - एकनाथ शिंदे

कल्याणमधील सोसायटीत मराठी कुटुंबासोबत घडलेल्या घटनेत शिवसेना मराठी कुटुंबाच्या पाठीशी ठाम आहे. या प्रकरणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या कर्मचाऱ्याला तत्काळ निलंबित केले असून त्याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कुणी कसे रहावे आणि काय खावे यावर कुणीही आक्षेप घेऊ शकत नाही. तसे करणे हे त्यांच्या मूलभूत अधिकारांवर गदा आणण्याचा प्रयत्न आहे. शिवसेना मराठी माणसाच्या न्याय हक्कासाठी लढायला कटिबद्ध असून कुणी शिवीगाळ करून मराठी कुटुंबावर हल्ला केला तर शिवसेना ते कदापि खपवून घेणार नाही, असा इशारा शिंदे यांनी दिला.

logo
marathi.freepressjournal.in