अमृता फडणवीसांच्या 'त्या' विधानावर काय म्हणाले अजित पवार?

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी केले होते विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या मुख्यमंत्री होण्यावर एक वक्तव्य
अमृता फडणवीसांच्या 'त्या' विधानावर काय म्हणाले अजित पवार?

गेले काही दिवस विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या राज्यातल्या राजकारणामध्ये चांगलीच चर्चा होत आहे. कधी ते पक्षापासून नाराज असल्याच्या चर्चा येत आहेत. तर कधी ते भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याच्या चर्चा आहेत. अशामध्ये एका कार्यक्रमात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी त्यांच्या संदर्भात एक विधान केले होते. त्या म्हणाल्या होत्या की, 'झोकून काम करणारा नेता मुख्यमंत्री झालेला आम्हालाही आवडेल,' यानंतर अजित पवार यांना याबाबद्दल विचारण्यात आले.

पत्रकारांनी अमृता फडणवीस यांनी केलेल्या विधानावर प्रतिक्रिया विचारली असता अजित पवार म्हणाले की, "मग त्यामध्ये वाईट काय आहे? मला जर कुणी चांगले म्हणत असेल, तर मला त्याचे समाधान आहे. प्रत्येकाने चांगले काम करावे म्हणजे प्रत्येकाला लोक चांगलेच म्हणतील. त्यांनी काय बोलावे हा त्यांचा अधिकार आहे. मी त्याला काय उत्तर देऊ शकतो? हे मला कळलेले नाही." अशी प्रतिक्रिया त्यांनी यावर दिली.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in