वेट अँड वॉच... अजितदादाच होणार राज्याचे मुख्यमंत्री; अमित शहांचे नाव घेत राष्ट्रवादीच्या नेत्याचा दावा

गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादीचे नेते अजित पवार हे चांगलेच चर्चेत असून मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत त्यांना मोठा दावेदार मानले जात असून आता चर्चाना उधाण आले
वेट अँड वॉच... अजितदादाच होणार राज्याचे मुख्यमंत्री; अमित शहांचे नाव घेत राष्ट्रवादीच्या नेत्याचा दावा

गेले काही दिवस महाराष्ट्राच्या राजकारणात अजित पवार हे चांगलेच राहिले आहेत. आधी नाराजीच्या चर्चांमुळे तर आता भावी मुख्यमंत्री म्हणून बॅनर झळकल्याने ते सध्या चांगलेच चर्चेत आहेत. आता तर थेट राष्ट्रवादीच्या नेत्यानेच एक मोठे विधान केले आहे. राष्ट्रवादीचे काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी म्हणाले की, "अजित पवार हेच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होणार आहेत, वेट अँड वॉच."

राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी बीडमध्ये एका कार्यक्रमात म्हणाले की, "सध्याच्या घडीला राज्याचे राजकारण सांभाळू शकेल, असा अजित पवारांसारखा दुसरा तोलामोलाचा नेता राज्यात नाही, असे खुद्द अमित शाह यांनी कबुल केले आहे. अजित पवार हे मुख्यमंत्री होणारच. वेट अँड वॉच." असा खात्रीशीर दावा त्यांनी केला. पुढे ते म्हणाले की, "सक्तीच्या रजेवर गेलेले मुख्यमंत्री एकनाथ शिंदेचा कृपा करून याच्याशी संबंध जोडू नका." असा टोलादेखील लगावला."राज्यामध्ये पुन्हा महाविकास आघाडीचे सरकार येणार आणि अजित पवार हे मुख्यमंत्री होणार," असे विधान त्यांनी केले आहे. त्यामुळे आता त्यांच्या विधानानंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in