जातिनिहाय जनगणनेविषयी अजित पवारांचं मोठं वक्तव्य ; म्हणाले, "कितीही पैसा खर्च झाला तरी..."

यावेळी मराठा आरक्षणाबाबत परखड मत व्यक्त करताना त्यांनी वाढल्या लोकसंख्येला देखील आळा घालण्याचं आवाहन केलं.
जातिनिहाय जनगणनेविषयी अजित पवारांचं मोठं वक्तव्य ; म्हणाले, "कितीही पैसा खर्च झाला तरी..."

बिहारमध्ये नितिश कुमार यांच्या नेतृत्वातील सरकारने जातीय जनगणना केल्याने जातीनिहाय जनगणनेचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे. यानंतर काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी देखील काँग्रेस शासित राज्यात जातीनिहाय जनगणना करण्याची घोषणा केली. त्याच बरोबर नुकत्याच जाहिर झालेल्या पाच राज्यांच्या विधानसभेच्या निवडणूकतीत जर तेलंगणात काँग्रेसचं सरकार बसलं तर जातीनिहाय जनगणना करण्याचा शब्द राहुल यांनी दिला आहे. असं असताना आता राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जातीनिहाय जनगणेचं समर्थन करत मोठं वक्तव्य केलं आहे.

अजित पवार आज सोलापूरमधील माढा येथे आले असाताना त्यांनी जातिनिहाय जनगणनेला उघड पाठिंबा दिला आहे. कितीही पैसा खर्च झाला तरी चालेल, पण राज्यात एकदा जातीनिहाय जनगणना व्हायला हवी,असं अजित पवार यांनी म्हटलं आहे. यावेळी मराठा आरक्षणाबाबत परखड मत व्यक्त करताना त्यांनी वाढल्या लोकसंख्येला देखील आळा घालण्याचं आवाहन केलं.

यावेळी बोलताना अजित पवार म्हणाले की, २०२१ साली जनगणना व्हायला हवी होती. पण ती झाली नाही. मुख्यमंत्र्यांनी बिहारमध्ये जातीय जनगणना कशी करण्यात आली. याची माहिती मागवली आहे. पैसा खर्च झाला तरी चालेल. पण जनगणना गरजेची असल्याचं अजित पवार यांनी म्हटलं.

ते पुढे म्हणाले की, आरक्षणाने ६२ टक्क्यांची मर्यादा ओलांडली आहे. तरीही त्यात राहून मराठा समाजाला आरक्षण कसं देता येईल याबाबत मार्ग काढतोय. उद्या आरक्षण ठिकलं नाही तर हेच लोक बोलतील, असं देखील अजित पवार म्हणाले. विलासराव देशमुख असताना आरक्षणाच्या मागणीने डोकं वर काढलं होतं. पृथ्वीराज चव्हाण यांच्या काळात आरक्षण देण्याचा निर्णय झाला होता. आम्हाला देण्यात आलेल्या सल्ल्याविषयी आम्ही आरक्षण दिलं देखील. पण ते कोर्टात टिकलं नाही. नंतर फडणवीस सरकार आलं. त्यांनी दिलेंलं मराठा आरक्षण हे उच्च न्यायालयात टिकलं मात्र सर्वोच्च न्यायालयात ते टिकलं नाही, असं देखील ते म्हणाले.

अजित पवार यांनी आरक्षणाच्या मुद्याला थेट लोकसंख्येशी जोडलं आहे. जसजशा पिढ्या वाढत जातात तसं शेतीचे तुकडे पडतात. त्यामुळे शेतकरी अल्पभूधारक होतो. कोणी थांबायलाच तयार नाही. स्वातंत्र्यावेळी आपण ३५३ कोटी होतो. आता १४० कोटी झालोय. चौपटीने लोकसंख्या वाढली आहे. आता आपण एक दोन आपत्यांवर थांबायला हवं. देवाची कृपा...देवाची कृपा..काही देवाची कृपा नसते. आपली कृपा असते. असं परखड मत अजित पवार यांनी यावेळी व्यक्त केलं.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in