अजित पवार याचं मोठं विधान; म्हणाले,"आम्ही युती केली असली तरी...."

प्रत्येक गोष्टीला उत्तर द्यायला मी बांधिल नाही. आमची बांधिलकी लोकांशी आहे. ती आम्ही ठेवू, असं देखील अजित पवार म्हणाले.
अजित पवार याचं मोठं विधान; म्हणाले,"आम्ही युती केली असली तरी...."

परिस्थिती बघून राजकीय युती करावी लागते, यातून कुठलाच पक्ष सुटलेला नाही. हातावर हात ठेऊन विरोध करणं हा आपला अजेंडा नाही. सत्तेत बसून लोकांची कामे कशी मार्गी लागतील हे महत्वाचं आहे. आम्ही युती केली असली तरी पक्षाचा विचार सोडलेला नाही. विरोधी पक्षाचे लोक रोज वल्गना करतात. पण प्रत्येक गोष्टीला उत्तर द्यायला मी बांधिल नाही. आमची बांधिलकी लोकांशी आहे. ती आम्ही ठेवू, अशी भुमिका राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कर्जत येथील राष्ट्रवादीच्या निर्धार सभेत मांडली.

अजित पवार यावेळी बोलताना म्हणाले की, सध्या महाराष्ट्राचे वातावरण वेगळ्या पद्धतीचे आहे. प्रत्येकाला आपलं म्हणणं मांडण्याचा अधिकार, पण इतरांच्या भावना दुखावणार नाही, समाजात तेढ निर्माण होणार नाही. जातीत वाद निर्माण होणार नाही याची खबरदारी घ्यायला हवी. मराठा समाज आणि धनगर समाजाला आरक्षण हवं आहे. ओबीसी समाजाला त्यांच्या आरक्षणाला धक्का लागू नये वाटते. पण इतरांना दिलेल्या आरक्षणला धक्का न लावता या समाजांना आरक्षण द्यायला हवं यावर सर्वांच एकमत आहे. तशी पावलं सरकार टाकतं आहे,असं देखील अजित पवार म्हणाले.

ते पुढे बोलताना म्हणाले की, पाच वर्षात चार वेळा नैसर्गिक संकटे आली. ठोस भूमिका घ्यावी लागेल. राज्य सरकारच्या माध्यमातून चार हजार कोटींची कामे केली जाणार आहेत. ही कामे लवकरच सुरु होतील. राज्यात १ लाख जागांची भरती प्रक्रिया सुरु केली आहे. रोजगार निर्मिती, नवे उद्योग यावे यासाठी प्रयत्न आहे. मुंबईतील मरीन ड्राईव्ह येथे राज्य सरकारच्या माध्यमातून मराठी भाषा भवन उभारलं जाणार आहे. २५० कोटी खर्चून, दीड लाख चौरस फुटाची भव्य इमारत बांधली जाणार आहे. अवाकाळीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना विमाकंपन्यांना नुकसान भरपाई देण्याचे निर्देश दिले दिले आहेत. सरकारकडून देखील त्यांना मदत दिली जाणार आहे, असं अजित पवार यांनी स्पष्ट केलं.

logo
marathi.freepressjournal.in