‘पश्चाताप’ महायुतीला बारामतीत विजय मिळवून देईल? शिवसेना खासदार संजय राऊत यांची उपरोधिक शंका

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांच्या काही राजकीय कृत्यांचा आता पश्चात्ताप करण्यात काहीच अर्थ नाही, या पश्चातापाने महायुतीला बारामतीमध्ये येणाऱ्या...
‘पश्चाताप’ महायुतीला बारामतीत विजय मिळवून देईल? शिवसेना खासदार संजय राऊत यांची उपरोधिक शंका
Published on

मुंबई : महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांच्या काही राजकीय कृत्यांचा आता पश्चात्ताप करण्यात काहीच अर्थ नाही, या पश्चातापाने महायुतीला बारामतीमध्ये येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत विजय मिळेलच असेही नाही, अशी टीका शिवसेनेचे (ठाकरे गट) खासदार संजय राऊत यांनी सोमवारी केली.

राऊत यांनी सांगितले की, काका शरद पवार आणि त्यांच्या पक्षाशी अजित पवार यांनी जे केले त्याबद्दल त्यांनी पश्चात्ताप करण्यात आता काहीही अर्थ नाही. अजित पवार बारामती विधानसभा निवडणुकीत नक्कीच पराभूत होतील. मुंबई दौऱ्यावर असलेले केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यावरही राऊत यांनी निशाणा साधला. ते म्हणाले, भाजप नेते मुंबईला राजकीय आणि आर्थिकदृष्ट्या कमकुवत करत राहतील. आम्ही या भाजप नेत्यांच्या अशा धोरणांच्या विरोधात आहोत.

नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत अजित पवार यांनी पत्नी सुनेत्रा यांना चुलत बहीण आणि राष्ट्रवादीच्या (शरद पवार गट) खासदार सुप्रिया सुळे यांच्याविरोधात उमेदवारी दिली होती. मात्र आपण ही चूक केल्याचे अजित पवार यांनी नुकतेच जाहीरपणे कबूल केले होते.

logo
marathi.freepressjournal.in