अकोला : दोन कारची भीषण टक्कर, ६ जण ठार ; आमदार सरनाईकांच्या नातलगांचा मृतांमध्ये समावेश

अकोला जिल्ह्यात शुक्रवारी दोन कारची टक्कर होऊन झालेल्या भीषण अपघातात सहा जण ठार झाले असून तिघे जण गंभीर जखमी झाले आहेत.
सौजन्य (एक्स)
सौजन्य (एक्स)

अकोला : अकोला जिल्ह्यात शुक्रवारी दोन कारची टक्कर होऊन झालेल्या भीषण अपघातात सहा जण ठार झाले असून तिघे जण गंभीर जखमी झाले आहेत. मृतांमध्ये अमरावती शिक्षक मतदारसंघाचे आमदार किरण सरनाईक यांच्या तीन नातेवाईकांचा समावेश आहे. अकोला-वाशीम महामार्गावर पातूर घाट येथील उड्डाणपुलाजवळील शिगर नाल्याजवळ दुपारी हा अपघात झाला. आमदार किरण सरनाईक यांचे पुतणे रघुवीर सरनाईक (२८) त्यांची बहीण व तीन नातेवाईक अकोल्याच्या दिशेने आपल्या ‘एसयूव्ही’ कारमधून जात असताना समोरून येणाऱ्या कारशी त्यांच्या वाहनाची टक्कर झाली. या अपघातात आमदार सरनाईक यांचे तीन नातेवाईक ठार झाले व दोघे जण जखमी झाले. टक्कर झालेल्या दुसऱ्या कारमधील अन्य तीन जणही या अपघातात ठार झाले व अन्य एक जण जखमी झाला. अपघात एवढा भीषण होता की दोन्ही गाड्यांचा अक्षरशः चुराडा झाला आहे.

मृतांमध्ये आमदार किरण सरनाईकांचे तीन नातेवाईक

या अपघातात आमदार किरण सरनाईक यांचा पुतण्या रघुवीर सरनाईक, शिवानी सरनाईक (आमले), अस्मिरा अजिंक्य आमले (९ महिने) यांच्यासह दुसऱ्या गाडीतील अकोला जिल्ह्यातील आसटूल गावातील कपिल इंगळे आणि ठाकरे या दोघांचा मृत्यू झाला व अन्य एक वर्षाची एक बालिका मृत्यू पावली. तीन जखमींना अकोला येथील शासकीय वैद्यकीय कॉलेज रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

logo
marathi.freepressjournal.in