मराठा आरक्षणावर सरकारच्या हालचालींना वेग; आज दिवसभर होणार चर्चा: मनोज जरांगे व्हिसीद्वारे उपस्थित राहणार

मला चार भिंतींच्या आत चर्चा नको आहे. मला लाईव्ह चर्चा करायची आहे. परंतु, सरकार लाईव्ह चर्चेला तयार नाही. मी गेलो तरी चर्चा होणार आहे. मी तिथे जाऊन लाईव्ह झालेच नसते. त्यामुळे व्हिसीद्वारे चर्चा होणार असल्याचे जरांगे यांनी सांगितले.
मराठा आरक्षणावर सरकारच्या हालचालींना वेग; आज दिवसभर होणार चर्चा: मनोज जरांगे व्हिसीद्वारे उपस्थित राहणार

मराठा आरक्षणाचा तिढा अजूनही सुटलेला नाही. आंदोलक मनोज जरांगे-पाटील यांनी मुंबईतील आझाद मैदानावर उपोषणाला बसण्याचा इशारा दिल्यानंतर सरकारने आपली गती वाढवली आहे. मराठा आरक्षणाच्या मुद्यावर आज चार मॅरेथॉन बैठका पार पडणार आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली दुपारी चार वाजता बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. जरांगे यांनी या बैठकीला जाणार नसल्याचे सांगितले. मात्र, ते व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे या बैठकीला उपस्थित राहणार आहेत.

आज होणाऱ्या बैठकीला राज्यमंत्रिमंडळ, मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री उपस्थित राहणार आहेत. उपसमिती आणि राज्य मागासवर्गिय आयोगाचीही बैठक आज पार पडणार आहे. याबाबत अधिकृत पत्रात उल्लेख नाही, परंतु सरकारकडून तसे सांगण्यात आल्याचे जरांगे यांनी सांगितले. तसेच जनरल सॉलिसिटरपासून महाराष्ट्रातील सर्व सचिव, मंत्री या बैठकीला उपस्थित राहणार असल्याचेही जरांगे म्हणाले.

पूर्वनियोजित कार्यक्रम असल्याने मी बैठकीला जाऊ शकत नाही. मी बैठकीला यावे असा त्यांचा आग्रह होता. पण, मी जाऊन काय करणार? मुख्यमंत्र्यांनी बैठकीला येण्याचे निमंत्रण दिले. फोन करुन विनंती केली. आम्ही आमदार बच्चू कडू, मंत्री उदय सामंत, मंत्री गिरीश महाजन यांच्याकडे म्हणणे मांडले आहे. त्यामुळे बैठकीला जाऊन मी काय करणार? असा सवाल त्यांनी केला.

मला चार भिंतींच्या आत चर्चा नको आहे. मला लाईव्ह चर्चा करायची आहे. परंतु, सरकार लाईव्ह चर्चेला तयार नाही. मी गेलो तरी चर्चा होणार आहे. मी तिथे जाऊन लाईव्ह झालेच नसते. त्यामुळे व्हिसीद्वारे चर्चा होणार असल्याचे जरांगे यांनी सांगितले.

दरम्यान, सरकार सकारात्मक आहे, परंतु मराठ्यांना आरक्षण देत नाही. आजच्या चर्चेतून सरकारची भूमिका लक्षात येईल. 20 तारखेला मराठे मुंबईला जाणार म्हणजे जाणार, असेही जरांगे यांनी स्प्ष्ट केले.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in