इंजिनिअरिंगसहित सर्व शिक्षण मराठीमधून होणार, उपमुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा

मराठी भाषेला समृद्ध करण्याचे काम स्वातंत्र्यसैनिक सावरकर यांनी केले. भारतीय भाषा जिवंत ठेवण्यासाठी ज्ञानाचे भाषेत रूपांतर केले पाहिजे
इंजिनिअरिंगसहित सर्व शिक्षण मराठीमधून होणार, उपमुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा

मराठी भाषा ही ज्ञानभाषा व्हावी यासाठी प्रयत्न सुरू आहेत. इंजिनिअरिंग इतर शिक्षणही मराठी भाषेतून होणार असल्याची घोषणा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. येत्या काळात सर्व शिक्षण मराठीतून होणार असल्याचे फडणवीस म्हणाले.

'मराठा तितुका मेळवावा' मुंबईत आयोजित करण्यात आले होते. सभेचे उद्घाटन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते झाले. यावेळी फडणवीस बोलत होते. यावेळी केंद्रीय मंत्री पियुष गोयल, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मराठी भाषा विभागाचे मंत्री दीपक केसरकर उपस्थित होते.

नेमकं काय म्हणाले फडणवीस ?

फडणवीस म्हणाले, "आता आपण मराठी भाषेतून अभियांत्रिकी किंवा इतर शिक्षण घेणार आहोत. मराठी भाषेला ज्ञानभाषा बनवणार आहोत. मराठी नाट्यसंस्कृतीची प्रगल्भता इतरत्र कुठेही पाहायला मिळणार नाही. आयटी जगतात मराठी माणसांचे वर्चस्व आहे. महाराष्ट्र औद्योगिक क्षेत्रात पुढे होते.आता पुढे आहे.येत्या काळात ते आणण्याचा प्रयत्न केला जाईल.जगातील प्रत्येक खंडातील लोक या सभेला उपस्थित होते. मराठी भाषेला समृद्ध करण्याचे काम स्वातंत्र्यसैनिक सावरकर यांनी केले. भारतीय भाषा जिवंत ठेवण्यासाठी ज्ञानाचे भाषेत रूपांतर केले पाहिजे, याची जाणीव पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आहे. 

मराठी माणूस बाहेर नाही गेला पाहिजे : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, आपली उत्सव संस्कृती जोपासली पाहिजे. मराठी भाषिकांसाठी जे काही करायला हवे ते करायला आम्ही तयार आहोत. आमचे सरकार आल्यानंतर सर्व सण सुरू झाले आहेत. मुंबईतील मराठी माणसांना बाहेर पडू नये यासाठी आम्ही प्रयत्न करू. जे बाहेरगावी गेले आहेत त्यांना मुंबईत आणण्याचा प्रयत्न करू. G20 चे अध्यक्षपद मिळणे ही मोठी गोष्ट आहे. मराठी माणूस जगभर आहे ही आनंदाची बाब आहे. मुंबईत मराठी टक्का घसरू देणार नाही.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in