
दोन दिवसांपूर्वी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह राष्ट्रवादीच्या सर्व मंत्र्यांनी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांची भेट घेतली होती. जवळपास तासभर ही बैठक चालली होती. यानंतर आज पुन्हा एकदा अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवाजीच्या सर्व बंडखोर आमदार शरद पवार यांच्या भेटीला गेले आहेत.
शरद पवार थोड्याच वेळात यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये येणार आहेत. यावेळी पवार या आमदारांशी संवाद साधणार असून या भेटीत काय चर्चा होते याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.