येणारे सर्व सण निर्बंधाशिवाय साजरे होणार – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

शुक्रवारी डोंबिवली येथे दीपेश म्हात्रे फाऊंडेशन तर्फे आयोजित करण्यात आलेल्या दहीहंडी महोत्सवाला मुख्यमंत्री यांनी हजेरी लावली.
येणारे सर्व सण निर्बंधाशिवाय साजरे होणार – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

कल्याण : येणारे सर्व सण निर्बंधाशिवाय साजरे होणार असल्याचे आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले. शुक्रवारी डोंबिवली येथे दीपेश म्हात्रे फाऊंडेशन तर्फे आयोजित करण्यात आलेल्या दहीहंडी महोत्सवाला मुख्यमंत्री यांनी हजेरी लावली यावेळी ते बोलत होते.

या दहीहंडी उत्सवाला येण्यासाठी मुख्यमंत्री शिंदे यांनी रात्री साडे अकरा वाजता भरपावसात मानकोली वेलेगाव ते डोंबिवली मोठागाव गणेश घाट दरम्यान बोटीने प्रवास करत दाखल झाले. मुख्यमंत्र्यांना व्यासपीठावर पाहताच संध्याकाळपासून वाट पाहत असलेल्या गोविंदा पथक आणि नागरिकांमध्ये एक वेगाळाच उत्साह उफाळून आला. यावेळी भाषणाला सुरवात करण्याआधीच मुख्यमंत्री शिंदे यांनी, "एकदम आवाज कमी करा, फक्त गोविंदांना इथल्या लोकांना ऐकायला येईल इतकाच ठेवा, नियम आपल्याला पाळायचे आहेत. सर्व गोविंदांच मनापासून स्वागत करतो.", असं बोलत भाषणाला सुरुवात केली.

यावेळी शिंदे यांनी यंदा दोन वर्षानंतर साजरा होणाऱ्या या दहीहंडी उत्सवात गोविंदांचा उत्साह मोठ्या प्रमाणात दिसून आल्याचं सांगितलं. हे सर्वसामान्यांचं सरकार आहे, सर्वसामान्यांच्या हिताचा निर्णय घेणार. संस्कृती परंपरा जोपासण्यासाठी सरकार प्रयत्न करतंय, दीड महिन्यांत तब्बल सातशे निर्णय घेतले असे शिंदे यांनी सांगितलं. पुढे बोलताना शिंदे यांनी दहीहंडी उत्सव तर उत्साहात साजरा झाला. आता यापुढे येणारे गणेशोत्सव आणि नवरात्रोत्सव उत्साहा सोबत सर्व सण उत्सव साजरा होणार असं सांगितलं.

मुख्यमंत्रीपदाची सूत्रं हाती घेतल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पहिल्यांदाच डोंबिवलीत आले होते. त्यामुळे कार्यक्रमस्थळी एकनाथ शिंदे यांचा जोरदार स्वागत देखील करण्यात आलं. माजी महापौर पुंडलिक म्हात्रे आणि माजी नगरसेवक तथा महोत्सवाचे आयोजक दिपेश म्हात्रे यांनी पुष्पगुच्छ आणि शाल, श्रीफळ देऊन स्वागत करण्यात आले. दरम्यान खासदार श्रीकांत शिंदे डोंबिवलीत दीपेश म्हात्रे फाउंडेशनच्या दहीहंडी उत्सवासाठी आले होते. खासदार श्रीकांत शिंदे यांनी देखील मानकोली वेलेगाव ते डोंबिवली मोठा गाव गणेश घाट येथे बोटीनं प्रवास केला.

कल्याण डोंबिवलीचा दौरा लवकरच होणार...

मुख्यमंत्री झाल्यानंतर पहिल्यांदा डोंबिवलीत आलो आहे. कल्याण डोंबिवलीला येणार, येथील काही प्रश्न आहेत ते मी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मंत्री मंडळ यांच्या सह चांगल काम करण्याची संधी मिळाली असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले. राज्याचा विकास सर्वसामान्यांना न्याय देण्याचा काम सरकार नक्की करेल.

बोट चांगली होती प्रवास सुरक्षित झाला

रात्री साडे अकरा वाजता भर पावसात टग बोटीने प्रवास केला. या बोटीतून अनेक प्रवासी डोंबिवली मोठागाव गणेश घाट ते माणकोली वेलेगाव येथे प्रवास करतात. जवळजवळ ५० प्रवासी एका फेरीत असतात. या बोटीच्या प्रवासाबाबत बोलताना मुख्यमंत्री शिंदे यांनी बोट चांगली होती असे सांगितले. सुरक्षितपणे आलोय, या ठिकाणी पोहोचलोय, अशी मिश्किल प्रतिक्रिया देतानाच खरं म्हणजे कार्यकर्त्यांचा आग्रह होता. आग्रहापुढे शेवटी नेत्याला देखील यावंच लागतं, अस सांगितलं.

गोविंदा उत्सव होणार प्रो गोविंदा

गोविंदा उत्साहवरील निर्बंध शिथिल केल्यानंतर मोठ्या जोशात सन साजरा होत आहे. त्याचप्रमाणे उत्सव साजरा करताना गोविंदाने आपली सुरक्षितता घेत आपली संस्कृती जपण्याचा कार्यक्रम, उत्सव साजरा करायचा आहे. याठिकाणी समाधान वाटत आहे, ज्या ठिकाणी दहीहंडी उत्सवाला गेलो तीथे उत्साह पाहायला मिळाला.

तर तुम्ही सर्वजण मुख्यमंत्री आहेत...

मी एकटा मुख्यमंत्री नाही तर तुम्ही सगळेजण मुख्यमंत्री आहात कारण आज तुमच्यातलाच एकनाथ शिंदे येथे मुख्यमंत्री म्हणून बसले आहेत. गोविंदांना उद्देशून बोलताना तुम्ही हंड्या खूप फोडल्या, आम्ही पण दीड महिन्यापूर्वी ५० जणांची हंडी फोडली. मुंबई – सुरत - गुहाटी पण होतं असा टोला लगावला. सर्वसामान्यांना न्याय देण्यासाठी हे सरकार स्थापन झालंय. गोविंदासाठी निर्णय घेतलेत, शेवटी सरकार लोकांचं आहे. लोकांना जे पाहिजे ते देण्याचं काम आपलं सरकार करणार आहे. म्हणून, जे काही तुम्हाला हवंय, या जनतेला पाहिजे जे जनतेच्या हिताचे प्रश्न आहेत, ते सोडवण्याचा काम एक-दीड महिन्यांमध्ये करतोय. जे मागच्या अडीच वर्षात झालं नाही ते दीड महिन्यांमध्ये आम्ही करण्याचा प्रयत्न केला. या दीड महिन्यात तब्बल सातशे निर्णय घेतल्याच मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितलं. सण उत्सवाबाबत आपली संस्कृती परंपरा पुढे नेण्यासाठी घेतलाय. दहीहंडी उत्सव तर उत्साहात साजरा केलाच आहे. पण येथे गणेशोत्सव, नवरात्रोत्सव देखील मोठ्या धुमधडाका साजरा करण्यात येईल, असं एकनाथ शिंदे यांनी सांगितलं.

Related Stories

No stories found.
marathi.freepressjournal.in