अन्न व औषध खात्यात भ्रष्टाचार; विक्रेता संघटनेचा संजय राठोड यांच्यावर आरोप

अन्न व औषध खात्यात भ्रष्टाचार; विक्रेता संघटनेचा संजय राठोड यांच्यावर आरोप

औषध विक्रेता संघटनेने भ्रष्ट विक्रेत्यांना पाठिशी घालू नये. खात्याकडून नियमानुसार कारवाई होत असते.

औषध विक्रेता संघटनेने भ्रष्ट विक्रेत्यांना पाठिशी घालू नये. खात्याकडून नियमानुसार कारवाई होत असते. खात्यावर भ्रष्टाचाराचे आरोप करून अशा प्रकारे दबाव टाकणे चुकीचे आहे. याउपरही त्यांच्या काही अडचणी असतील तर मंत्रालयात संघटनेसोबत बैठक घेऊन त्या सोडविण्याची माझी तयारी असल्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री संजय राठोड यांनी स्पष्ट केले आहे.

अन्न व औषध प्रशासन खात्यात प्रचंड भ्रष्टाचार असल्याची लेखी तक्रार ड्रगिस्ट असोसिएशनने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली होती. यामुळे एकच खळबळ उडाली. त्यावर अन्न व औषध प्रशासन मंत्री संजय राठोड यांनी स्पष्टीकरण दिले आहे. विभागाच्या अधिकाऱ्यांकडून स्थानिक पातळीवर कारवाई करण्यात येत असते. ड्रग इन्स्पेक्टर औषध विक्रेत्यावर कारवाई करतो. त्यानंतर सहआयुक्तांकडे अपील करता येते. त्यानंतर माझ्याकडे प्रकरण येत असते. आतापर्यंत ७ हजार जुनी प्रकरणे प्रलंबित आहेत.

परवाना रद्द झालेली ३ हजार दुकाने आहेत. मात्र, काही औषध विक्रेते किराणा दुकानाप्रमाणे विक्री करत असतात. झोपेच्या गोळ्या असतील किंवा लैंगिक संबंधी औषधे असतील, ती सरसकट विकून मोठ्या प्रमाणात पैसे कमावले जातात. अशा भ्रष्ट विक्रेत्यांवर कारवाई होत असेल, तर संघटनेने अशा प्रकारे दबाव आणणे योग्य नाही. मी जर खालच्या अधिकाऱ्यांच्या निर्णयाला अशा प्रकारे स्थगिती द्यायला लागलो तर त्यांच्याही मनोधैर्यावर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे संघटनेच्या काही अडचणी असतील तर येत्या सोमवार किंवा मंगळवारी मी मंत्रालयात बैठक घेऊन तोडगा काढायला तयार आहे. पण, अशा प्रकारे दबाव टाकणे चुकीचे आहे. भ्रष्ट औषध विक्रेत्यांना संघटनेने पाठिशी घालू नये, असे आवाहनही संजय राठोड यांनी केले.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in