हिंदीबरोबरच मराठी चित्रपटसृष्टीनेही मजल मारण्याची गरज; ज्येष्ठ चित्रपट निर्माते, दिग्दर्शक महेश मांजरेकर यांचे प्रतिपादन

दक्षिणेतील चित्रपट सृष्टीने खूप प्रगती केली. तुलनेने हिंदी बरोबर मराठी चित्रपट सृष्टीने आज देखील मजल मारण्याची गरज आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ चित्रपट निर्माते दिग्दर्शक महेश मांजरेकर यांनी केले.
हिंदीबरोबरच मराठी चित्रपटसृष्टीनेही मजल मारण्याची गरज; ज्येष्ठ चित्रपट निर्माते, दिग्दर्शक महेश मांजरेकर यांचे प्रतिपादन

वार्ताहर/वसई

मनोरंजन सृष्टीतील चित्रपट माध्यम काळाच्या कसोटीवर विकसित होत गेले. तरी आजच्या बदलत्या दुनियेत पूर्वी सिनेमा गृहात पाहिले जाणारे चित्रपट आता दूरदर्शनवरील प्रगत ओटीटी (ओव्हर द टॉप) वाहिनीवर चित्रपट पाहिले जातात. यामध्ये मुंबई दूरदर्शन, मेट्रो नंतर अनेक चॅनेल्सवरुन सिरियल व चित्रपट आपण पाहू लागलो. यामध्ये दक्षिणेतील चित्रपट सृष्टीने खूप प्रगती केली. तुलनेने हिंदी बरोबर मराठी चित्रपट सृष्टीने आज देखील मजल मारण्याची गरज आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ चित्रपट निर्माते दिग्दर्शक महेश मांजरेकर यांनी केले. यावेळी मांजरेकर, चित्रपट समीक्षक दिलीप ठाकूर, तसेच ज्येष्ठ पत्रकार श्रीकांत बोजेवार यांनी जागतिक मराठी अकादमीच्या 'शोध मराठी मनाचा' या संमेलनात झालेल्या 'चित्रपटगृह ते ओटीटी' या परिसंवादात भाग घेऊन उदबोधक चर्चा केली.

काळाबरोबर चित्रपट सृष्टी बदलत गेली. भारतात हिंदी चित्रपट सृष्टी टॉपवर राहिली तरी जगाच्या व देशाच्या आर्थिक राजधानी मुंबई हिंदी, मराठी चित्रपटाची पाळे-मुळे रुजली.गेल्या ५०-६० वर्षात या चित्रपट सृष्टीत तांत्रिकदृष्टया व मनोरंजनाच्या सादरीकरणात कसकसे बदल होत गेले यावर या परिसंवादात विस्तृत चर्चा करण्यात आली.

विवा महाविद्यालयाच्या उपप्राचार्या प्राजक्ता परांजपे यांनी या त्रिकुटाशी संवाद साधला. दिलीप ठाकूर हे गेली तीस-चाळीस वर्षे वृत्तपत्र समीक्षक म्हणून चित्रपट सृष्टीचा अभ्यास करुन चित्रपटांचे उत्तम परीक्षण करतात. तसेच दर्जेदार चित्रपटांची मार्मिक समीक्षा करुन ज्येष्ठ पत्रकार श्रीकांत बोजेवार यांनी वाचकांच्या मनात स्थान मिळविले आहे. त्यांनी बदलती चित्रपट सृष्टी व त्यात मराठी चित्रपटाने एकूणच तांत्रिक व आर्थिकदृष्टया कशी प्रगती साधली पाहिजे व त्यासाठी मराठी म्हणून एकत्र येऊन मराठी चित्रपट सृष्टी दक्षिणेच्या तुलनेत समर्थ केली पाहिजे, असे प्रतिपादन केले.

पूर्वी चित्रपट गृहात एखादा सिनेमा वर्ष सहा महिने चालत असे. दिवसाला तीन ते चार खेळ होत असत. तेव्हा आठवड्याला पन्नास-साठ शो होत असत. आता हे चित्रपट एकाच वेळी असंख्य ठिकाणी प्रदर्शित होऊन कोट्यावधी रुपयांचे उत्पन्न मिळवितात. दक्षिणेतील चित्रपटकर्ते तांत्रिकदृष्टया अतिशय प्रगत आहेत. पूर्वी त्यांना मुंबईतील हिंदी चित्रपटाचे नामवंत कलाकार आपल्या चित्रपटात घ्यावे लागत, आता ते दक्षिणेतील कलाकारच चित्रपट हिंदीत डब करुन भारतभर प्रदर्शित करतात. प्रसिद्धीवर तसेच वितरणावर कोट्यावधी रुपये खर्च करुन ते चित्रपटांच्या प्रचंड खर्चाचा आर्थिक डोलारा सांभाळतात. मराठी चित्रपट सृष्टीला मात्र तेवढी मजल मारणे शक्य झालेले नाही. त्या दृष्टीने आता तरी प्रयत्न होणे गरजेचे आहे. असे या मान्यवरांनी नमूद केले.

logo
marathi.freepressjournal.in