खडसेंची दुहेरी निष्ठा!

एकनाथराव खडसे यांनी भाजपात प्रवेश घेण्याचे जाहीर केले हे वृत्त येईपर्यंत खडसेंच्या भाजप प्रवेश लांबणीवर गेला आहे. एकनाथ खडसे भाजपात असले व आले असले तरी त्यांची कन्या रोहिणी खडसे या राष्ट्रवादीत राहणार असून त्या सध्या राष्ट्रवादीच्या एक पदाधिकारी आहेत.
खडसेंची दुहेरी निष्ठा!

- मतं आणि मतांतरे

अरविंद भानुशाली

देशभरात यापूर्वी भाजपा- जनता दल यांच्यात संघर्ष झाला. भाजपने रा. स्व. संघाबरोबरची दुहेरी निष्ठा सोडावी यासाठी खूप संघर्ष झाला. अटलबिहारी यांचे केंद्रातील सरकारविरुद्ध त्यांच्याच जनता दलातील नेत्यांनी लोकसभेत एकच हंगामा केला. अखेर या दुहेरींच्या निष्ठेवर भाजपचे समर्थन केले. आमची मातृसत्ता ही सध्या रा. स्व. संघ आहे. शेवटी याच प्रश्नावर अटलजींचे सरकार कोसळले. हा इतिहास आहे. आज दुहेरी निष्ठेवर एक प्रश्न उपस्थित झाल्याने हा प्रपंच!

एकनाथराव खडसे यांनी भाजपात प्रवेश घेण्याचे जाहीर केले हे वृत्त येईपर्यंत खडसेंच्या भाजप प्रवेश लांबणीवर गेला आहे. एकनाथ खडसे भाजपात असले व आले असले तरी त्यांची कन्या रोहिणी खडसे या राष्ट्रवादीत राहणार असून त्या सध्या राष्ट्रवादीच्या एक पदाधिकारी आहेत.

हे चित्र पाहिल्यानंतर खडसे कुटुंबाच्या दुहेरी निष्ठा असल्याचे समोर आले आहे. खडसे भाजपात येण्यापूर्वी भाजपने त्यांची खुर्ची विद्यमान खासदार रक्षा खडसे यांना भाजपातर्फे लोकसभेचे तिकीट देण्याचे दुसऱ्या यादीतच जाहीर केले. कारण रक्षा खडसे यांनी मतदारसंघात काम केले असून त्या भाजपात सक्रिय आहेत. आश्चर्याची बाब म्हणजे रोहिणी खडसे या २०१९ मध्ये भाजपच्या उमेदवार होत्या. परंतु पिताश्रींनी राष्ट्रवादीची कास धरताच रोहिणी खडसे यांनी भाजप सोडून वडिलांबरोबर राष्ट्रवादी गाठली होती.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in