अमळनेर अ.भा. साहित्य संमेलनासाठी दोन कोटींचा निधी ;जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांची माहिती

सामान्य नागरिकांसाठी स्वतंत्र प्रवेश स्ववस्था असावी गर्दी व गोंधळ होऊ नये म्हणून बाहेर पडण्यासाठी दोन मार्ग असावेत
अमळनेर अ.भा. साहित्य संमेलनासाठी दोन कोटींचा निधी ;जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांची माहिती

जळगाव : अमळनेर येथे होणाऱ्या अ. भा. मराठी साहित्य संमेलनासाठी शासनाकडून दोन कोटीं रूपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी शुक्रवारी अमळनेर येथे एका बैठकीत बोलताना दिली.

२ मे ५ फेब्रुवारी दरम्यान अमळनेर येथे अ. भा. मराठी साहित्य संमेलन होत असून, या संदर्भात जागेची पाहाणी व नियोजन या बाबत संबंधितांशी चर्चा करण्यासाठी जिल्हाधिकारी यांनी अमळनेरला भेट देत जागेची पाहाणी केली. या नंतर प्रताप महाविदयालयात झालेल्या बैठकीत जिल्हाधिकारी प्रसाद यांनी बोलताना पालिकेने शहराचे सुशोभीकरण व स्वच्छता करावी, व्हीआयपी तसेच सामान्य नागरिकांसाठी स्वतंत्र प्रवेश स्ववस्था असावी गर्दी व गोंधळ होऊ नये म्हणून बाहेर पडण्यासाठी दोन मार्ग असावेत, हे होत असलेले साहित्य संमेलन उत्त्म दर्जाचे व्हावे या साठी लोकसहभाग वाढवण्याची सूचना त्यांनी आयोजकांना केली. तसेच संमेलनातील विविध सत्रांसाठी समिती नेमावी, साहित्यिकांना राहण्यासाठी टेंट सिटी उभारता येईल काय? याबाबत अधिकाऱ्यांशी चर्चा करण्याच्या सूचना आयोजकांना केल्या.

बैठकीस मराठी वाडमय मंडळाचे अध्यक्ष डॉ. अविनाश जोशी, उपजिल्हाधिकारी संजय गायकवाड, प्राचार्य ए. बी. जैन, मुख्याधिकारी प्रशांत सरोदे, मराठी वाडम मंडळ सदस्य, निमंत्रित उपस्थित होते.

logo
marathi.freepressjournal.in