आंबा घाटातील साडेतीन किलोमीटर बोगद्याला मंजुरी; कोकण-प. महाराष्ट्र प्रवास होणार जलद

कोकण आणि पश्चिम महाराष्ट्राला जोडणाऱ्या आंबा घाटातील प्रवास आता अधिक सोयीस्कर आणि जलद होणार आहे. या घाटातील डोंगरातून साडेतीन किलोमीटरचा बोगदा काढण्यास राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने मंजुरी दिली आहे.
आंबा घाटातील साडेतीन किलोमीटर बोगद्याला मंजुरी; कोकण-प. महाराष्ट्र प्रवास होणार जलद
आंबा घाटातील साडेतीन किलोमीटर बोगद्याला मंजुरी; कोकण-प. महाराष्ट्र प्रवास होणार जलद
Published on

रत्नागिरी : कोकण आणि पश्चिम महाराष्ट्राला जोडणाऱ्या आंबा घाटातील प्रवास आता अधिक सोयीस्कर आणि जलद होणार आहे. या घाटातील डोंगरातून साडेतीन किलोमीटरचा बोगदा काढण्यास राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने मंजुरी दिली आहे.

रत्नागिरी-कोल्हापूर राष्ट्रीय महामार्गावरील धोकादायक वळणे आणि अपघातांचे प्रमाण कमी करण्यासाठी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने हा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. या महत्त्वाकांक्षी प्रकल्पामुळे कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रातील प्रवास अत्यंत सुरक्षित आणि जलद होईल.

सध्या एका खासगी एजन्सीकडून या प्रकल्पाचे सर्वेक्षण सुरू करण्यात आले आहे. कोल्हापूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गाचे चौपदरीकरण युद्धपातळीवर सुरू असतानाच, साधारण सात किलोमीटर लांबीच्या आंबा घाटाच्या सुधारणा आणि रुंदीकरणाच्या दृष्टीने हे सर्वेक्षण महत्त्वाचे ठरणार आहे. विशेषतः पावसाळ्यात अनेक वेळा दरड कोसळण्याच्या प्रकारांमुळे हा घाट धोकादायक ठरतो.

या पार्श्वभूमीवर, घाटातील धोकादायक भाग कायमस्वरूपी वगळण्यासाठी हा मोठा निर्णय घेण्यात आल्याची माहिती आहे. या प्रकल्पाचा अहवाल तयार करताना पर्यावरणाचा समतोल, घाटातील वन्य प्राणी, राष्ट्रीय उद्यान आणि जंगल परिसराचा विचार केला जाणार असून, त्यानुसारच याला अंतिम स्वरूप देण्यात येणार आहे.

logo
marathi.freepressjournal.in