अतिवृष्टीमुळे अंबा नदीला पूर

दरवर्षी नित्यनेमाने नागोठणे अंबा नदीला जुलै महिन्यात पूरस्थिती उद्भवणे हे समीकरण काही नवीन नाही. गेली काही दिवस हुलकावणी देणाऱ्या पावसाने हवामान खात्याकडून वर्तविण्यात आलेल्या अंदाजानुसार गेल्या दोन-तीन दिवसांपासून जोरदार सुरुवात केली.
अतिवृष्टीमुळे अंबा नदीला पूर
Published on

नागोठणे : दरवर्षी नित्यनेमाने नागोठणे अंबा नदीला जुलै महिन्यात पूरस्थिती उद्भवणे हे समीकरण काही नवीन नाही. गेली काही दिवस हुलकावणी देणाऱ्या पावसाने हवामान खात्याकडून वर्तविण्यात आलेल्या अंदाजानुसार गेल्या दोन-तीन दिवसांपासून जोरदार सुरुवात केली.

अंबा नदीने धोक्याची पातळी ओलांडल्यानंतर काही क्षणातच पुराचे पाणी शिरल्याने नागरिक, दुकानदार तसेच टपरीधारक यांची एकच तारांबळ उडाली. सर्वत्र सध्या मोठ्या प्रमाणावर पाऊस पडत असल्याने अंबा नदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे. वरवठणे पूल पाण्याखाली गेला असल्याने तसेच एसटी बस स्थानक परिसर, फॉरेस्ट ऑफिस या परिसरात पाणी भरले असल्याने कोणीही सदर भागात गाडीने अथवा चालत प्रवास करू नये यासाठी पोलीस कर्मचारी पुराचे पाणी आलेल्या ठिकाणी तैनात करण्यात आले आहेत. तसेच अति उत्साहीपणा न दाखवता सर्वांनी आपली व आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी.

अतिवृष्टीमुळे आलेल्या पुरामुळे अंबा नदीवरील पाली येथील पुलावर पाणी असल्याने नागोठणेकडून वाकण पाली या मार्गावरील वाहतूक बंद असल्याने पोलीस व प्रशासनाकडून देण्यात आलेल्या सूचनांचे पालन करून सहकार्य करावे, असे सपोनि सचिन कुलकर्णी नागोठणे पोलीस ठाणे यांनी म्हटले आहे.

logo
marathi.freepressjournal.in