विधानपरिषदेत शिवीगाळ! अंबादास दानवे आणि प्रसाद लाड यांच्यात जोरदार खडाजंगी

अंबादास दानवे यांनी आपल्याला शिवीगाळ केल्याचा आरोप प्रसाद लाड यांनी केला असून दानवे यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी केली आहे.
विधानपरिषदेत शिवीगाळ! अंबादास दानवे आणि प्रसाद लाड यांच्यात जोरदार खडाजंगी
Published on

मुंबई: महाराष्ट्र विधीमंडळाचं पावसाळी अधिवेशन सध्या मुंबईतील विधानभवनात सुरु आहे. आज अधिवेशनाच्या चौथ्या दिवशी विधानपरिषदेमध्ये विरोधी पक्षनेते अंबादास दानवे आणि भाजप आमदार प्रसाड लाड यांच्यात जोरदार खडाजंगी झाली. यादरम्यान अंबादास दानवे यांनी आपल्याला शिवीगाळ केल्याचा आरोप प्रसाद लाड यांनी केला असून दानवे यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी केली आहे.

सध्या दिल्लीतील नवीन संसद भवनात संसदेचं पावसाळी अधिवेशन सुरु आहे. यावेळी आज विरोधी पक्षनेते राहुल गांधींनी आपल्या भाषणात विविध मुद्द्यांवरून केंद्र सरकारला दारेवर धरलं. दरम्यान आज विधानपरिषदेमध्ये राहुल गांधींनी मांडणी केलेले काही मुद्दे सत्ताधारी आमदारांनी सदनात मांडले आणि महाविकास आघाडीला स्पष्टीकरण विचारलं. यावेळी सभागृहात जोरदार खडाजंगी पाहायला मिळाली. विरोधी पक्षनेते अंबादास दानवे म्हणाले की, राहुल गांधींनी लोकसभेत वक्तव्य केलंय. त्याचा संबंध आपल्या कामकाजाशी येतो का? दरम्यान दानवे आपली भूमिका स्पष्ट करत असताना सत्ताधारी आमदारांनी आरडाओरड केली. यानंतर अंबादास दानवे यांचा तोल सुटला आणि त्यांनी प्रसाद लाड यांना भर सभागृहात शिवीगाळ केली. भर सभागृहात दोन्ही नेत्यांनी एकमेकांना शिवीगाळ केल्याचा प्रकार पाहायला मिळाला.

विधापरिषदेच्या सभागृहात झालेल्या खडाजंगीबद्दल विचारलं असता विरोधी पक्षनेते अंबादास दानवे म्हणाले की, "माझा तोल सुटलेला नाही, मी शिवसैनिक आहे. माझ्यावर कोण बोट उचललं तर बोट तोडायची ताकद माझ्या मनगटात आहे. तो या सभागृहाचा विषय नव्हता, सभापतींना बोलायला हवं होतं. माझ्याकडे बोट दाखवून, माझ्याकडे हातवारे करुन बोलायचा अधिकार नाही."

logo
marathi.freepressjournal.in