डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीचा उत्साह; छत्रपती संभाजीनगरमध्ये विविध कार्यक्रम

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त संपूर्ण शहर सज्ज झाले असून बाजारपेठांमध्ये झेंड्यांची मोठ्या प्रमाणावर खरेदी सुरू झाली आहे. यंदा विविध प्रकारचे आकर्षक झेंडे उपलब्ध झाल्यामुळे नागरिकांमध्ये उत्साहाचे वातावरण पाहायला मिळत आहे. शहरातील प्रमुख बाजारपेठांमध्ये सुमारे १० कोटी रुपयांचे झेंडे विक्रीसाठी बाजारात दाखल झाले आहेत.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीचा उत्साह; छत्रपती संभाजीनगरमध्ये विविध कार्यक्रम
डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीचा उत्साह; छत्रपती संभाजीनगरमध्ये विविध कार्यक्रम
Published on

छत्रपती संभाजीनगर : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त संपूर्ण शहर सज्ज झाले असून बाजारपेठांमध्ये झेंड्यांची मोठ्या प्रमाणावर खरेदी सुरू झाली आहे. यंदा विविध प्रकारचे आकर्षक झेंडे उपलब्ध झाल्यामुळे नागरिकांमध्ये उत्साहाचे वातावरण पाहायला मिळत आहे. शहरातील प्रमुख बाजारपेठांमध्ये सुमारे १० कोटी रुपयांचे झेंडे विक्रीसाठी बाजारात दाखल झाले आहेत.

छत्रपती संभाजीनगर येथील भडकल गेट येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा नवीन पुतळा बसविला जाणार आहे. त्यानंतर अभिवादन केले जाणार आहे. तसेच विविध ठिकाणी शहरात रॅली काढून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी केली जाणार आहे. त्यासाठी बाजार सज्ज झाले आहेत. तसेच रॅली काढुन डॉ. आंबेडकर यांची जयंती साजरी केली जाणार आहे. त्यासाठी मोठ्या प्रमाणात झेंड्याची मागणी केली जात आहे. तसेच शहरात विविध प्रकारचे झेंडे, पताका खरेदीवर भर देण्यात आल्याचे दिसून आले.

यंदा मुंबईतून डॉ. आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त झेंडे विक्रीसाठी आणले गेले आहेत, तर काही झेंडे शहरातच तयार करण्यासाठी मेहनत घेतली आहे. बाहेरून झेंडे आल्याने विक्रेत्यांच्या खर्चात वाढ झाली आहे.

वाहतुकीचा खर्च यंदा वाढलेला आहे. त्याचा परिणाम झेंडे यंदा महागले आहेत. यंदा १० ते २० टक्क्यांनी किमतीत वाढल्यामुळे दरवाढ झाली आहे. तरीही जयंतीचा उत्साह कमी झालेला नसून नागरिक मोठ्या वाढ झाल्याने ग्राहकांच्या खर्चात वाढ झाली आहे. कच्चा माल, छपाई आणि वाहतूक खर्च उत्साहात खरेदी करत आहेत. तसेच बाजारात कपडे खरेदीसाठी मोठी गर्दी झाली आहे. त्यासाठी भलेमोठे स्टेज उभारण्यात आले आहे.

‘कलम का बादशहा’चे आकर्षण कायम

डॉ. आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त शहरात असून बाजार सज्ज झाला आहे. त्यात खासकरून ‘कलम का बादशहा’ अशा संदेशांनी सजलेले झेंडेही मोठ्या प्रमाणावर विक्रीसाठी उपलब्ध झाले आहेत. गादिया विहार येथे यंदाच्या वर्षी राजहंस वनकर, अनामि मोरे, रमेश साळवे, गौतम हजारे यांनी बाबासाहेबांच्या जीवनावर मोठे बॅनर आकर्षणाचे केंद्र बिंदू ठरत आहे. स्वच्छता दूत निरीक्षक गौतम हिवराळे यांनी परिसर स्वच्छतेकडे विशेष लक्ष दिले आहे. आणखी एक वेगळेपण म्हणजे डॉ. आंबेडकर यांच्या सहीचे प्रतिकात्मक प्रिंट असलेले झेंडे. या झेंड्यांना तरुणाईकडून मोठी मागणी आहे. विविध आकार, रंगसंगती आणि आधुनिक डिझाइनमुळे बाजारपेठा रंगीबेरंगी झाल्या आहेत.

logo
marathi.freepressjournal.in