अंबरनाथ नगरपरिषद निवडणुकीसाठी उद्या मतदान; प्रशासकीय यंत्रणा सज्ज

अंबरनाथ नगरपरिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी शनिवार, २० डिसेंबर रोजी होणाऱ्या मतदानासाठी प्रशासकीय यंत्रणा सज्ज झाली आहे. शहरात जवळपास १५०० पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांचा फौजफाटा सज्ज राहणार असून मतदान प्रक्रिया पार पाडण्यासाठी १६२१ अधिकारी व कर्मचारी सज्ज असणार आहेत.
अंबरनाथ नगरपरिषद निवडणुकीसाठी उद्या मतदान; प्रशासकीय यंत्रणा सज्ज
अंबरनाथ नगरपरिषद निवडणुकीसाठी उद्या मतदान; प्रशासकीय यंत्रणा सज्ज(संग्रहित छायाचित्र)
Published on

अंबरनाथ : अंबरनाथ नगरपरिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी शनिवार, २० डिसेंबर रोजी होणाऱ्या मतदानासाठी प्रशासकीय यंत्रणा सज्ज झाली आहे. शहरात जवळपास १५०० पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांचा फौजफाटा सज्ज राहणार असून मतदान प्रक्रिया पार पाडण्यासाठी १६२१ अधिकारी व कर्मचारी सज्ज असणार आहेत.

अंबरनाथ नगरपरिषदेच्या निवडणुकीसाठी शनिवारी मतदान आणि रविवारी होणाऱ्या मतमोजणीसाठी पोलीस यंत्रणा सज्ज झाली. त्यासाठी शहरात ८०० पोलीस कर्मचारी, ११० अधिकारी, राज्य राखीव दलाच्या दोन तुकड्या, ४५० होमगार्ड शहरात नियुक्त असल्याची माहिती परिमंडळ चारचे पोलीस उपायुक्त सचिन गोरे यांनी दिली आहे, तर शहराच्या पूर्व आणि पश्चिम भागातील प्रत्येकी ७ शा एकूण १४ प्रभागांत पोलिसांचे पथक सज्ज असणार आहेत, तर १० वर्षांनंतर होऊ घातलेल्या मतदानाचा मतदारांमध्ये उत्साह आहे. त्यामुळे विना अडथळा मतदारांना मतदान करता यावे आणि मतदानाचा टक्का अधिक वाढवण्यासाठी निवडणुक अधिकाऱ्यांचे प्रयत्न आहेत.

शहरात २ लाख ५४ हजार ४७८ मतदार असून यात १ लाख १९ २९२ स्त्री मतदार, तर १ लाख ३५१६४ पुरुष मतदारांचा समावेश आहे. शहरात एकूण २७६ ठिकाणी मतदान केंद्रे उभारण्यात आली आहेत. एकूण २७६ ईव्हीएम मशीन या मतदान केंद्रात ठेवण्यात आल्या असून यात ४९ ईव्हीएम मशीन राखीव ठेवल्या आहेत. पॅनल पद्धत आणि थेट नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी एका मतदाराला तीन मत देता येणार असल्याने तीन मतांसाठी ९० सेकंदाला वेळ लागण्याचा अंदाज निवडणुक निर्णय अधिकाऱ्यांनी वर्तवला आहे.

logo
marathi.freepressjournal.in