Beed Accident: प्राण वाचवणाऱ्यांवर काळाचा घाला, रुग्णवाहिका ट्रकला धडकल्याने डॉक्टर, चालकासह दोघांचा मृत्यू

रात्री बारा वाजेच्या सुमारास हा अपघाता झाल्याचं सांगितलं जात आहे
Beed Accident: प्राण वाचवणाऱ्यांवर काळाचा घाला, रुग्णवाहिका ट्रकला धडकल्याने डॉक्टर, चालकासह दोघांचा मृत्यू

बीड जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. बीडच्या आष्टी तालुक्यातील धामणगाव येथून अहमदनकरडे रुग्णाला घेऊन जात असताना दौलावडगावच्या दत्तमंदीराजवळ रुग्णवाहिका आणि ट्रकचा भीषण अपघात झाला असून यात चार जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर एक जण गंभीररित्या जखमी झाला आहे. या अपघातात डॉ. राजेंद्र झिंजुर्के आणि वाहन चालकासह दोन जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे परिसरात मोठी उडाली. रात्री बारा वाजेच्या सुमारास हा अपघाता झाल्याचं सांगितलं जात आहे. या अपघातात जखमी असलेल्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

मिळाळेल्या माहितीनुसार आष्टी तालुक्यातील दौलावडगावातील दत्त मंदिराजवळ एक ट्रक रात्रीच्या वेळी धामणगावकडून अहमदनगरकडे जात होती. यावेळी डाव्या बाजूने वळण घेत असताना ट्रकला पाठीमागून आलेल्या रुग्णवाहिकेने जोरदार धडक दिली. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. या घटनेत वाहन चालकाचा जागीच मृत्यू झाला आहे. डॉ. राजेंद्र झिंजुर्के, रुग्णवाहिका चाकल भरत लोखंडे, मनज पांगु तिरपुडे, पप्पु पांगू तिरखुंडे असं या अपघात मृत्यूमुखी पडलेल्यांची नावे आहेत.

या अपघातानंतर बराचं वेळ रस्त्यावर वाहतुक कोंडी झाली होती. पोलिसांनी वाहतुक सेवा सुरळीत केली. रुग्णालयात घेऊन जात असल्याने रुग्णवाहिका भरधाव वेगात असल्याचं सांगितलं जात आहे. या दुर्घटनेत मृत पावलेल्यांचा मृतदेह शव विच्छेदनासाठी रुग्णालयात नेण्यात आलं आहे.

logo
marathi.freepressjournal.in