जिथे शक्य असेल, तिथे युती करा! अमित शहांचा अजित पवार गटाला सल्ला

महापालिका निवडणुकांचे बिगुल वाजताच राजकीय हालचालींना वेग आला असून, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या नेत्यांनी मंगळवारी दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली. प्रफुल पटेल आणि सुनील तटकरे यांनी महापालिका निवडणुकांची रणनीतीवर चर्चा केली असून, शहा यांनी स्थानिक पातळीवर लवचिक भूमिका घेण्याचे संकेत दिल्याचे सांगण्यात येते.
संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र
Published on

नवी दिल्ली : राज्यातील महापालिका निवडणुकांचे बिगुल वाजताच राजकीय हालचालींना प्रचंड वेग आला आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या वरिष्ठ नेत्यांनी मंगळवारी दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली. प्रफुल पटेल आणि सुनील तटकरे यांनी अमित शहांशी केलेल्या चर्चेत महापालिका निवडणुकांची रणनीती आखण्यात आली असून, शहा यांनी स्थानिक पातळीवर लवचिक भूमिका घेण्याचे संकेत दिल्याचे सांगण्यात येते.

राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल पटेल आणि महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची नवी दिल्लीत भेट घेतली. या बैठकीत अमित शहा यांनी अजित पवार गटाला सल्ला दिला की, राज्यात ज्या-ज्या ठिकाणी शक्य असेल, तिथे युती करून निवडणुका लढा.

स्थानिक राजकीय गणिते जुळवण्यासाठी जर अजित पवारांच्या राष्ट्रवादीला शरद पवारांच्या राष्ट्रवादीसोबत जावे लागले किंवा काही ठिकाणी जुळवून घ्यावे लागले, तर त्याला अमित शहा यांनी हिरवा कंदील दिल्याचे सूत्रांनी सांगितले. भाजपच्या या भूमिकेमुळे राजकीय वर्तुळात वेगळे संकेत मिळत असल्याची चिन्हे आहेत.

logo
marathi.freepressjournal.in