अमित शाह सगर बंगल्यावर! मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीसांसोबत बंद दाराआड चर्चा

सध्या राज्यात आमदार अपात्रतेचा मुद्दा गाजत असल्याने त्याच पार्श्वभूमीवर बंद दाराआड चर्चा झाल्याचं बोललं जात आहे.
अमित शाह सगर बंगल्यावर! मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीसांसोबत बंद दाराआड चर्चा

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आज मुंबई दौऱ्यावर असून त्यांनी भाजप नेते आशिष शेलार यांच्या सार्वजनिक गणपतीचे दर्शन घेतलं. त्यानंतर शाह हे लालबागच्या राजाच्या दर्शनाला गेले. लालबागच्या राजाचं दर्शन घेतल्यानंतर अमित शाह हे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सगर बंगल्यावर गेले. या ठिकाणी अमित शाह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात बंद दाराआड चर्चा झाल्याचं समजतं.

सध्या राज्यात आमदार अपात्रतेचा मुद्दा गाजत आहे. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी आमदारांच्या अपात्रतेप्रकरणी सोमवारी सुनावणी घेण्याचा निर्णय घेतला आहे. आज अमित शाह आणि मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांची बंद दाराआडची चर्चा त्याचं पार्श्वभूमीवर असल्याचं देखील बोललं जात आहे.

सर्वोच्च न्यायालयाने आमदार अपात्रता प्रकरणावर सुनावणी करताना विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना फटकारलं होतं. याप्रकरणी त्यांनी वेळ न लावण्याच्या सुचना केल्या होत्या. यानंतर राहुल नार्वेकर यांनी दिल्लीत जाऊन तुषार मेहता तसं इतर कायदेतज्ज्ञांनी भेट घेतली होती. कायदेतज्ज्ञांनी केलेल्या चर्चेनंतर त्यांनी २५ सप्टेंबर रोजी याबाबतची सुनावणी घेण्याचा निर्णय घेतला होता.

२५ सप्टेंबर रोजीच्या सुनावणीत शिवसेनेच्या दोन्ही गटांचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे हे सुनावणीवेळी समोरासमोर येण्याची शक्यता सांगितली जात आहे. राहुल नार्वेकरांकडून त्याबाबतचे संकेत देखील मिळाले आहेत. त्यामुळे २५ सप्टेंबर रोजीच्या सुनावणीकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलं आहे.

logo
marathi.freepressjournal.in