अमित शहा महाराष्ट्र दौऱ्यावर; नांदेडमधून स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीचा शंखनाद

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा २५,२६ आणि २७ मे असे तीन दिवस महाराष्ट्र दौऱ्यावर येत आहेत. २५ रोजी नागपूर, २६ रोजी नांदेड तर, २७ रोजी मुंबईत असणार आहेत. नांदेडमध्ये भाजपची जाहीर सभा होणार आहे. या सभेत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासह भाजपचे दिग्गज नेते उपस्थित असणार आहे.
संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र
Published on

नांदेड : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा २५,२६ आणि २७ मे असे तीन दिवस महाराष्ट्र दौऱ्यावर येत आहेत. २५ रोजी नागपूर, २६ रोजी नांदेड तर, २७ रोजी मुंबईत असणार आहेत. नांदेडमध्ये भाजपची जाहीर सभा होणार आहे. या सभेत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासह भाजपचे दिग्गज नेते उपस्थित असणार आहे. याच सभेतून भाजप स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीचा शंखनाद फुंकणार असल्याचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत सांगितले.

गृहमंत्री अमित शहा यांच्या दौऱ्याची माहिती देण्यासाठी भाजपतर्फे शनिवारी पत्रकार परिषद घेण्यात आली. यावेळी खासदार डॉ. अजित गोपछडे, जिल्हाध्यक्ष (दक्षिण) संतुक हंबर्डे, शहराध्यक्ष माजी आमदार अमरनाथ राजूकर आदींची उपस्थिती होती. पुढे बोलताना अशोक चव्हाण म्हणाले, लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीनंतर ते पहिल्यांदाच नांदेडला येत आहेत. त्यांच्या उपस्थितीत हरित क्रांतीचे प्रणेते तथा माजी मुख्यमंत्री स्व. वसंतराव नाईक यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण केले जाणार आहे.

शिवाय राज्यसभेचे खासदार डॉ. अजित गोपछडे आणि महानगराध्यक्ष अमरनाथ राजूरकर यांच्या संपर्क कार्यालयाचे उद्घाटन होणार आहे. भाजपकडून या सभेला 'शंखनाद' असे नाव देण्यात आले आहे. तसेच ऑपरेशन सिंदूरचे यश, सैन्याचा गौरव, विकसित भारताचा शंखनाद असल्याची माहिती माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी दिली.

logo
marathi.freepressjournal.in