अमित शहांनी सहकार क्षेत्रात क्रांतिकारी निर्णय घेतले, मुख्यमंत्र्यांनी केला कौतूकांचा वर्षाव

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे पुणे दौऱ्यावर असून त्यांच्या हस्ते सहकार विभागाच्या 'डिजिटल पोर्टल'चं शुभारंभ कार्यक्रमात मुख्यमंत्री बोलत होते.
अमित शहांनी सहकार क्षेत्रात क्रांतिकारी निर्णय घेतले, मुख्यमंत्र्यांनी केला कौतूकांचा वर्षाव

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे पुणे दौऱ्यावर असून त्यांच्या हस्ते सहकार विभागाच्या 'डिजिटल पोर्टल'चं शुभारंभ होणार आहे. या सोहळ्याला सुरुवात झाली असून या कार्यक्रमाला गृहमंत्री अमित शाह यांच्यासोबत केंद्रीय सहकार राज्यमंत्री एल.वर्मा, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे. उपमुख्यमंत्री अजित पवार, देवेंद्र फडणवीस, राज्याचे सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील, महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांची उपस्थिती आहे.

यावेळी बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यावर कौतूकांचा वर्षाव केला आहे. शाह यांचं सहकार क्षेत्रात मोठ योगदान आहे. नव पोर्टल सहकार क्षेत्रातील नवा आयाम असणार आहे, सहकार क्षेत्रात कार्यकारी निर्णय घेतला असून

अमित शाह यांनी एकदा निर्णय घेतला की ते थांबत नाहीत. नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांच्यामुळे देशात मोठा बदल घडत आहे. अमित शाह यांनी कारखान्यांचं १० हजार कोटी रुपयांचं कर्ज माफ करण्याचा निर्णय घेतला आहे. सहकार क्षेत्रासाठी त्यांचं नेतृत्व वरदान आहे. असं म्हणत एकनाथ शिंदे यांनी त्यांचं कौतूक केलं आहे.

अमित शाह यांनी सहकार क्षेत्रात क्रांतिकारी निर्णय घेतले आहेत. केंद्रीय सहकार खात्याचं काम उत्तम सुरु आहे. शाह सतत देशाचा विचार करतात. ग्रामीण अर्थव्यवस्था सक्षम करण्याच प्रयत्न शाह करत आहेत. त्यांच्यामुळेच सहकार क्षेत्राचा गैरवापर थांबला असल्याचंही एकनाथ शिंदे म्हणाले.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in