अमित शाह यांचं अजित पवारांबाबत मोठं वक्तव्य ; म्हणाले, "तुम्ही थोडा..."

देशभरातील सहकारी संस्थांच्या तुलनेत ४२ टक्के वाटा हा एकट्या महाराष्ट्राचा असल्याचं देखील शाह यांनी म्हटलं आहे.
अमित शाह यांचं अजित पवारांबाबत  मोठं वक्तव्य ; म्हणाले, "तुम्ही थोडा..."

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे पुणे दौऱ्यावर असून त्यांच्या हस्ते सहकार विभागाच्या 'डिजिटल पोर्टल'चं शुभारंभ होणार आहे. या सोहळ्याला सुरुवात झाली असून या कार्यक्रमाला गृहमंत्री अमित शाह यांच्यासोबत केंद्रीय सहकार राज्यमंत्री एल.वर्मा, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे. उपमुख्यमंत्री अजित पवार, देवेंद्र फडणवीस, राज्याचे सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील, महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांची उपस्थिती आहे.

या कार्यक्रमात बोलताना अमित शाह यांनी अजित पवार यांच्याबाबत वक्तव्य केलं आहे. उपमुख्यमंत्री झाल्यानंतर पहिल्यांदाच अजित पवार आपल्या कार्यक्रमात आहेत. ते माझ्यासोबत पहिल्यांदाच बसले आहेत. त्यामुळे मी त्यांना सांगू इच्छितो की, अजित दादा तुम्ही योग्य ठिकाणी बसलेले आहात. हीच तुमची योग्य जागा आहे, या ठिकाणी बसण्यासाठी तुम्ही थोडा उशिरच केला, असं वक्तव्य अमित शाह यांनी जाहीर कार्यक्रमात केलं आहे.

सहकार क्षेत्राविषयी बोलताना अमित शाह यांनी देश एका बाजूला आणि महाराष्ट्र एका बाजुला असं म्हटलं आहे. देशभरातील सहकारी संस्थांच्या तुलनेत ४२ टक्के वाटा हा एकट्या महाराष्ट्राचा असून हेच दाखवण्यासाठी मी इथं सर्वांना घेऊन आलो आहे. असं शाह म्हणाले. तसंच सहकार क्षेत्राचा मोठा डेटा तयार होत असून त्यात तुम्हाला तुमच्या गावातील, जिल्ह्यातील, राज्यातील सहकार क्षेत्रासंबंधीती सगळी माहिती उपलब्ध होणार आहे. त्यामुळे प्रत्येक वरिष्ठांना आपल्या गावाची माहिती लगेच मिळेल, अशी उपाय योजना करण्यात येणार असून हा डेटा बनवण्याचं ५० टक्के काम पूर्ण झालं असल्याचं शाह म्हणाले.

यावेळी त्यांनी महाराष्ट्रातील प्रत्येक साखर कारखान्यात इथेनॉलची निर्मिती व्हायलाच हवी. यासाठी राज्य सरकारने पावलं उचण्याच्या सुचना केल्या. तसंच राज्याचे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यांना देखील आज सकाळच्या बैठकीत सुचना दिल्याचं शाह म्हणाले. यावेळी त्यांनी आतापर्यंत १० हजार कोटींची घोषणा केली. मात्र, जेवढे पैसै हवे तेवढे देऊ असंही शाह यांनी सांगितलं.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in