"...यामुळे अमित शाहांचं महाराष्ट्रावर जास्त प्रेम" ; अजित पवारांकडून कौतूक

अमित शाह यांनी लोकसभेत बील आणून सर्वच साखर कारखान्यांचा टॅक्स माफ करण्याचा निर्णय घेतला", असं अजित पवार म्हणाले.
"...यामुळे अमित शाहांचं महाराष्ट्रावर जास्त प्रेम" ; अजित पवारांकडून कौतूक

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आज पुणे दौऱ्यावर आले असून त्यांनी सहकार क्षेत्राच्या डिजीटल पोर्टलचा शुभारंभ केला. या कार्यक्रमात केंद्रीय सहकार राज्यमंत्री एल.वर्मा, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे. उपमुख्यमंत्री अजित पवार, देवेंद्र फडणवीस, राज्याचे सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील, महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांची उपस्थिती होती. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पडलेल्या फुटीनंतर पहिल्यांदाचं अमित शाह यांच्याबरोबर अजित पवार व्यासपिठावर उपस्थित होते. यावेळी बोलताना अजित पवार यांनी अमित शाह यांच्यावर स्तुतीसुमने उधळली.

यावेळी बोलताना अजित पवार म्हमाले की, "देशात सहकार क्षेत्राचा मोठा इतिसाह असून सहकार ग्रामीण भागापासून शहरात पोहचला आहे. देशात पहिल्यांदाच सहकार मंत्रालय सुरु करण्यात आलं आहे. सहकार हे एकमेव क्षेत्र आहे जे गावागावात पोहचलं आहे. अमित शाह हे गुजरातचे आहेत. पण त्यांचं महाराष्ट्रावर जास्त प्रेम आहे. कारण ते महाराष्ट्राचे जावाई आहेत. कारण प्रत्येक जावायाचं सासरवाडीवर जास्त प्रेम असतं. गुजरात आणि महाराष्ट्र दोन्ही एकच राज्य होते. या दोन्ही राज्यांचा सहकार क्षेत्रातील इतिहास गौरवशाली राहिला आहे", असं अजित पवार यांनी सांगितलं.

"सामाजिक, राजकीय आणि सांस्कृतीक क्षेत्राला समृद्ध करण्यासाठी सहकार विभागाने मोठ योगदान दिलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या काळात पहिल्यांदाच सहकार मंत्रालय स्थापन करण्याचा निर्णय झाला असून अमित शाह देशाचे पहिले सहकारमंत्री झाले आहेत. देशात साखरेचं मोठ्या प्रमाणावर उत्पादन घेतलं जात असून आयकरमुळे देशातील सगळेच साखर कारखाने अडचणीत आले होते. मात्र, पंतप्रधान मोदींनी घेतलेल्या निर्णयामुळे साखर कारखाने अडणीतून बाहेर पडले आहेत. अमित शाह यांनी लोकसभेत बील आणून सर्वच साखर कारखान्यांचा टॅक्स माफ करण्याचा निर्णय घेतला", असं अजित पवार म्हणाले.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in